Lioness And leopard Fight Viral Video : सोशल मीडियावर खतरनाक प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. कधी मोठे प्राणी छोट्या प्राण्यांची शिकार करतात, तर कधी दोन मोठ्या प्राण्यांमध्ये तुफान हाणामारी होते. बिबट्याने माणसांवर आणि इतर प्राण्यांवर हल्ला केल्याचं तुम्ही याआधी पाहिलं असेल. पण बिबट्याने एखाद्या प्राण्याला घाबरुन धूम ठोकल्याचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिला आहे? नसेल तर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा. कारण एक सिहिंण बिबट्याची कशाप्रकारे उचलबांगडी करते, याचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बिबट्याचा आणि सिंहिणाचा WWE चा थरार पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही, कारण सिंहिणीने बिबट्यावर जे डावपेच टाकले ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सिंहिण आणि बिबट्याच्या हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. एक बिबट्या आणि थतरनाक सिंहिण एकमेकांशी भिडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण सिंहिणीने बिबट्याची हवा टाईट केल्यावर त्याने थेट झाडावर पळ काढल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण सिहिंण त्या बिबट्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करते. बिबट्याला जेव्हा कळतं, की सिहिंणीच्या डावपेच भारी पडतील, तेव्हा तो बिबट्याही झाडावर पळून जातो आणि स्वत:चा जीव वाचवतो.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की, बिबट्या नशिबवान आहे. नाहितर बिबट्याचे प्राण वाचणे अशक्यच होतं. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर wildtrails.in वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओता आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक व्यूज आणि दोन हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. बिबट्याचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर आले आहेत. पण एका सिहिंणीने बिबट्याला घाम फोडल्याचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण बिबट्यासारखआ खतरनाक प्राणी अनेकदा प्राण्यांची शिकार करताना दिसतो. पण यावेळी मात्र सिहिंणीच्या पुढे बिबट्याला हार पत्करावी लागल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे.