Lioness Saves Calf Viral Video: सिंह असो वा सिंहिण, या प्राण्यांमुळे संपूर्ण जंगल थरथर कापते. सिंहिणीला संधी मिळताच ती आपली शिकार फाडून खाते. त्यांचे प्राणघातक पंजे आणि तीक्ष्ण दात कोणालाही क्षणात बळी बनवू शकतात. सिंहिणीला क्रूर शिकारी म्हणून ओळखले जाते. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा रोमांचक आणि डोळ्यांवर विश्वास न बसणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात जंगलात घडलेली एक अनपेक्षित घटना सर्वांनाच थक्क करून टाकते आहे. हा केवळ एक व्हिडीओ नाही, तर हिंस्रतेच्या जगात करुणेचा एक अपवादात्मक क्षण साक्षात पाहायला मिळतो आणि हे सगळं घडतं एका भूक लागलेल्या सिहिंणीच्या कृतीतून, नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

व्हिडीओची सुरुवात होते जंगलातील एका सुनसान भागात एकट्याच उभ्या असलेल्या एका वासरुपासून. तो बिचारा घाबरलेला, असहाय स्थितीत आहे. एवढ्यात एक सिहिंण हळूहळू येऊन त्याच्या अगदी जवळ येते… आणि क्षणभर वाटतं, आता हा वासरुही संपलाच! पण, पुढचा क्षण मन सुन्न करणारा ठरतो.

सिंहिण काही न करता त्याच्या जवळ निवांत बसते. एवढ्यात दुसरी एक भुकेलेली सिंहिण तिथं धावत येते आणि थेट वासरुवर झडप घालण्याचा प्रयत्न करते. पण, इथेच सगळा सीन पलटतो. पहिली सिंहिण अचानक जागी होते आणि दुसऱ्या सिंहिणीवर आक्रमण करते. दोघींमध्ये तीव्र झटापट सुरू होते. या सगळ्या गोंधळात वासरु एका कोपऱ्यात लपून बसतो, पण पहिली सिंहिण त्याला काहीही होऊ देत नाही आणि दुसऱ्या सिंहिणीला दूर हुसकावून लावते.

हा अविश्वसनीय क्षण म्हणजे जणू जंगलाच्या क्रूर नियमांना फाटा देत माया आणि करुणाचं उदाहरण आहे. इतकं सुंदर दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. हा व्हिडीओ नेमका कुठे आणि कधी शूट करण्यात आला, याबद्दल स्पष्ट माहिती नाही. मात्र, ‘ईको प्लॅनेट’ या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या या १६ सेकंदांच्या क्लिपने ४.२ कोटीहून अधिक व्ह्युज कमावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

नेटिझन्सकडून या सिंहिणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिला ‘मसीहा सिंहिण’ असं संबोधलं आहे, तर काहींनी या घटनेला नैसर्गिक करुणेचं अद्वितीय उदाहरण मानलं आहे. काही लोकांनी मात्र प्रश्न विचारले, “जिचा स्वभावधर्मच शिकारी आहे, ती सिंहिण एवढं सहृदय कसं काय वागली?”, अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.