सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कसा व्हायरल होईल सांगता येत नाही. प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ नेटकरी डोक्यावर घेतात. प्राण्याच्या हरकती, त्यांची शिकार करण्याची पद्धत नेटकरी आवर्जून बघतात. सिंहाव्यतिरिक्त वाघ, चित्ता आणि बिबट्या जंगलात शिकार करतात. त्यामुळे संबंधित भागात या प्राण्यांमध्ये स्पर्धा दिसून येते. कित्येकदा हे प्राणी एकमेकांशी शिकारीच्या हद्दीवरून भिडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक सिंहीण बिबट्याला हुसकावताना दिसत आहे.
सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जाते. त्याचा जंगलात दरारा असतो. सिंह शिकार करून आपलं पोट भरतो. त्यामुळे या प्राण्यांची शिकारीची हद्द निश्चित असते. आपल्या हद्दीत दुसरा प्राणी आली की त्यांना आवडत नाही. असाच एक बिबट्या शिकारीच्या हद्दीत आल्याने सिंहाला राग अनावर झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक सिंहीण बिबट्याला हुसकावताना दिसत आहे. सिंहीणीपासून आपला जीव वाचवून बिबट्या पळताना दिसत आहे. साधारणपणे सिंह जमिनीवर राहून शिकार करतात आणि झाडावर मोठ्या उंचीवर चढू शकत नाहीत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहीण झाडावर चढते आणि बिबट्याला हुसकावते. बिबट्याने सिंहिणीच्या हद्दीत शिकार केली आणि झाडावर नेऊन आरामात खात होता. मात्र बिबट्याच्या उपस्थितीची माहिती मिळताच सिंहीण त्याला धडा शिकवण्यासाठी झाडावर चढते. सिंहिणीचं उग्र रुप पाहून बिबट्या पळण्यासाठी धडपड करतो आणि फांदी तुटते. जसा बिबट्या जमिनीवर पडतो तसा जीव वाचवण्याासठी धूम ठोकतो.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.