Viral video: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे. पण मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नसेल तर कशालाही किंमत नाही. आईची किंमत ही आई गेल्यावरच कळते असं नेहमी आपण एकत आलोय. अशाच एका आईविणा जगणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वय नाही पण परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मोठं बनवते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल..

आईशिवाय जगणं काय असतं हे त्यालाच माहिती ज्याला आई नाहीये. ज्याला खेळण्या-बागडण्याच्या वयातच जबाबदारी आणि कष्टानी पकडून ठेवलंय. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. मात्र काही मुलांवर खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चिमुकला एकीकडे अभ्यास करत आहे तर दुसरीकडे भाकरी करत आहे. यावेळी त्याचा हातही भाजल्याचं दिसत आहे. आपल्या कुटुंबातील, समाजातील आर्थिक गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण फार गरजेचे आहे. घरची परिस्थिती आपणच बदलायला हवी आणि ते केवळ शिक्षणानेच शक्य आहे. हे या चिमुकल्याला कळलं असावं, आणि म्हणूनच त्यानं आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन संघर्ष करायचं ठरवलं आहे. या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून त्याच्या वेदना किती मोठ्या आहेत, याचा तुम्हाला अंदाज येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शुभमंगल…पण सावधान! लग्नाच्या हॉलमधून केली १० लाखांची रोकड लंपास; घटनेचा video होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @dream__upsc24या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.