लहान भावाचे आणि मोठ्या बहिणीचे नाते फार खोडकर असते. अनेकदा दोघांमध्ये खाण्यावरून, खेळण्यावरून भांडण होत असते. यावेळी मोठी बहीण लहान भावाला समजून घेण्याचा प्रयत्न करते. आई-वडिलांनंतर मोठी बहीण ही लहान भावाची मार्गदर्शक असते. त्यामुळे वेळोवेळी त्याला चांगल्या वाईट गोष्टी समजवते, त्याचे खूप लाड करते. सोशल मीडियावरही भावा-बहिणीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर आपल्याला आपले बालपण आठवते. अशाच एका लहान भाऊ आणि मोठ्या बहिणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लहान भाऊ मोठ्या बहिणीसह खेळण्यावरून भांडण करताना दिसत आहे. या दोघांमधील भांडण पाहून अनेकांना आपले बालपण आठवतेय.

व्हिडीओमध्ये लहान भाऊ मोठ्या बहिणीशी खेळण्यासाठी भांडताना दिसत आहे. यावेळी बिचारी बहीण मुकाट्याने लहान भावाची बडबड ऐकून घेते. हे पाहून तुम्हालाही लहानपणी तुमच्या मोठ्या बहिणीची किंवा लहान भावाशी खेळण्यावरून केलेल्या भांडणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोघे भाऊ-बहीण खेळण्यावरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. यात सुरुवातीपासून भाऊ जे बहिणीला ओरडण्यास सुरुवात करतो ते शेवटपर्यंत तिला बडबड करत राहतो. यावेळी तो नेहमी तुझंच ऐकायचं का? असा जाब विचारत बहिणीला एक बुक्का देईन, की रडतच बसशील अशी धमकी देतो.

हेही वाचा – जगात पैसा आहे कमवता आला पाहिजे! लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करत करतोय कमाई; पाहा Video

चिमुरडा बहिणीला म्हणतोय की, तू माझ्याशी खेळतच नाहीय. यावर बहीण, अरे मी थोड्या वेळाने तुला ऑर्डर देणारच आहे ना, असे म्हणते. यावेळी भाऊ तिला रागवत म्हणतो की, आता ऑर्डर दे ना, थोड्यावेळाने का, आता दे ना… तुझंच ऐकायचं… मी अजिबात खेळणार नाही आणि तुला घराबाहेर ठेवेन, उलट माझ्याशी तू खेळायला पाहिजे. मी जर खूप चिडलो ना तर असलं रक्त चढेल ना, असला बुक्का देईन, की रडत बसशील. भावाची ही दादागिरी बिचारी बहीण मुकाट्याने सहन करत ऐकत उभी राहते. पण, या लहान मुलासह खेळायला कोणी नाही म्हणून होत असलेली चिडचिड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. पण, बहीण-भावामधील संभाषण पाहून काहींना खूप हसू येत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by आपली tales(10K) (@aaplitales)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aaplitalesया इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या भावा-बहिणीबरोबरच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका युजरने लिहिले आहे, हा व्हिडीओ पाहून खरंच मला माझा भाऊ आठवला. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, लहान मुलगा किती गोड शुद्ध बोलतोय. यावर अनेकांनी कमेंट्समध्ये हार्टच्या इमोजीही पोस्ट केल्या आहेत.