जेव्हा चिमुकल्या मुलीने एअरपोर्ट सुरक्षारक्षकाकडे केली ‘ही’ विनंती… भावूक करणारा हा VIDEO VIRAL

सध्या एका लहान मुलीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकलीने एअरपोर्टवर एका सुरक्षारक्षकाला विनंती केलीय. या मुलीने केलेली ही गोड विनंती पाहून सोशल मीडियावर साऱ्याच जणांचं मन पिळवटून गेलंय.

little-girl-asks-airport-security-to-aunt-to-hug-viral
(Photo: Twitter/ Kaptan Hindustan™)

सध्या एका लहान मुलीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकलीने एअरपोर्टवर एका सुरक्षारक्षकाला विनंती केलीय. या मुलीने केलेली ही गोड विनंती पाहून सोशल मीडियावर साऱ्याच जणांचं मन पिळवटून गेलंय. एअरपोर्टवरील या लहान मुलीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलंय. तिच्या निरागसतेने त्या सुरक्षारक्षकाचं सुद्धा मन पिघळून गेलं आणि या चिमुकलीने केलेल्या विनंतीला त्याने परवानगी दिली. त्यापुढचं दृश्य पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे मात्र नक्की….

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लाल रंगाचा आकर्षक फ्रॉक परिधान केलेली एक चिमुकली दिसून येतेय. एअरपोर्टमध्ये चेक पॉईंटच्या पुढे गेल्यानंतर ही चिमुकलीला पुन्हा एकदा मागे जायचं असल्याचं दिसून येतेय. पण बाजुलाच एअरपोर्टवरील सुरक्षारक्षक उभा असल्याचं पाहून ती पुन्हा मागे जाण्यासाठी विचार करताना दिसून येतेय. एकदा एअरपोर्टमध्ये आत प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर जाता येत नाही हे या चिमुकलीला सुद्धा कळतंय, हे नवल. यासाठी ती आपल्या बोबड्या चालीत एकदा बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याची विनंती ही चिमुकली करताना दिसून येते. एअरपोर्ट बाहेर उभी असलेल्या तिच्या मावशीला तिला एकदा घट्ट मिठी मारायची होती. हे पाहून त्या सुरक्षारक्षकाचं मन पिघळलं आणि त्याने या चिमुकलीला बाहेर जाण्याची परवानगी दिली.

एअरपोर्टवरील सुरक्षारक्षकाने आपल्याला मावशीला भेटण्यासाठी परवानगी दिल्यानंतर ही चिमुकली लगचेचच आपल्या छोट्या पावलांनी तुरुतुरू धावत आपल्या मावशीकडे गेली. मावशी सुद्धा तिच्याकडे येत असताना या चिमुकलीने तिच्या मावशीला घट्ट मिठी मारली. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स खूपच भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ कतार मधल्या हमद इंटरनॅशनल एअरपोर्टमधला असल्याचं सांगितलं जातंय. मात्र हा व्हिडीओ कधी कॅप्चर केला गेलाय, याबाबत मात्र कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. तरीही सुद्धा या गोंडस मुलीच्या निरागसतेने लाखो लोकांची मन जिंकली आहेत.

‘कप्तान हिंदुस्तान’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत सात मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. या व्हिडीओला लाइक करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढताना दिसून येतेय. ७३ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय. तसंच २१ हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्वीट केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Little girl asks airport security before running to aunt to hug her prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या