Viral video: ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथा, बलिदान, आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. विशेषतः चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यांनी अनेक प्रेक्षकांना भावूक केले आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेमा थिएटरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.यामध्ये धड बोलताही येत नसलेल्या चिमुकलीला अश्रू अनावर झाले आहेत.

चित्रपट संपल्यानंतर एक चिमुकली अक्षरश: धाय मोकलून रडताना दिसतेय. चित्रपटात शेवटी महाराजांनी केलेलं बलिदान दाखवण्यात आलं आहे. अन् ती दृश्य पाहून ही चिमुकली फारच भावूक झाली. ती तिच्या आईलाही विचारत आहे संभाजी महाराजांना का मारलं? तिचा रडतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

थिएटरमध्ये नेमकं काय घडलं

हा व्हिडीओ शेअर करत या चिमुकलीच्या आईनं थिएटरमध्ये नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. “एवढ्याशा जीवाला सुद्धा अश्रू अनावर झाले. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज -१ हा चित्रपट श्रावीनी एकदाही लक्ष न डावलता पूर्ण बघितला. चित्रपट बघताना प्रत्येक वेळी ती छत्रपती संभाजी महाराज की जय हे बोलत होती.. खूप प्रश्न विचारत होती. त्यांना जेव्हा जेव्हा त्रास होतोय असा सिन आला की तिला तो बघवत नव्हता, वाईट लोक असं का करत आहेत किती चांगले आहेत ते, त्यांचे आई-बाबा,आजी नाहीयेत याचं दुःख आणखी वेगळं होत तिला. राज्याभिषेक सिनला प्रचंड आनंदी होती जस काय आत्ताच तिच्या समोर खरा राज्यअभिषेक होत आहे.

जेव्हा माझ्या पोटात होती तेव्हा…

एवढासा जीव पण किती ते प्रेम किती ती समज. मला खरंच श्रावी च्या ह्या वागण्याने अगदी भरून पावल्या सारखं झालं. मी खरंच तिला काही तरी चांगलं शिकवलं आहे शिकवते आहे आणि तिला त्यात रुची वाटते,प्रेम वाटतं,याचा मला खरंच अभिमान आहे. श्रावी जेव्हा माझ्या पोटात होती तेव्हा Lockdown होतं,दररोज ५-१० भाग मी छत्रपती संभाजी महाराज मालिका (स्वराज्यारक्षक संभाजी) बघितली होती आणि बघून पूर्ण केली होती कारण माझी इच्छा होती की माझ्या बाळाने त्यांच्या सारखं असावं आणि जेव्हा श्रावी झाली तेव्हा तिचे पाळण्यातले नाव आम्ही ‘येसु’ ठेवले होतं. आज जे तिचं हे त्यांच्या वरचं प्रेम तिचा त्या भावना बघून मला समजलं की माझं बाळ खुप साऱ्या गोष्टी हे पोटातून शिकून आलंय,धन्य झाले मी. दुसरा अध्याय बघणं फारच कठीण जाणार आहे तिला तरी सुद्धा आम्ही तिला तो दाखवणार. व्हिडिओ सांगून जातोय की चित्रपट किती सुंदर पद्धतीने आपल्या समोर मांडला आणि सादर केला आहे. नक्की हा चित्रपट बघाच.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं खूप कौतुक करताहेत. लोक म्हणताहेत, “हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.”