लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं, एक चूक अन् मोठा अपघात. अशे बरेच प्रकार आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ७ वर्षांची मुलगी ४ वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकताना दिसत आहे. हे संपूर्ण दृश्य तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते खूपच भीतीदायक आहे. खेळताना मुले बोअरवेलमध्ये पडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अनेक वेळा अशा घटनांमध्ये मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर काही प्रकरणांमध्ये त्यांचा मृत्यूही झाला आहे. अनेकवेळा अशी प्रकरणेही समोर आली आहेत, ज्यामध्ये बचाव पथकाला मेहनत घ्यावी लागते. अनेकदा काही बोअरवेलचे काम सुरू असताना झाकण उघडे राहिल्याने अशा घटना घडतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनमधील युनानचा आहे. तिथल्या एका गावात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी एका लहान मुलाला घेऊन जाते आणि त्याला ५ मीटर खोल विहिरीत फेकून देते. मुलगी त्या मुलाला उचलून विहिरीत टाकते, त्यानंतर मुलगा विहिरीच्या काठाला धरून लटकायला लागतो. थोड्यावेळाने आतील मूल मदतीसाठी ओरडत आहे, पण कोणालाही या प्रकाराची कल्पना नसल्यामुळे कोणीही मदतीला येत नाही. ती मुलगी थोडा वेळ विहिरीजवळ घिरट्या घालते आणि तिथून निघून जाते.

थोड्यावेळाने, गावातील इतर लोकांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्याला विहिरीतून बाहेर काढले. या मुलाचे वय ४ वर्षे असून या घटनेत त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.ही दोन्ही मुले शेजारी असून अनेकदा एकत्र खेळत असत. मुलाला विहिरीत टाकणाऱ्या मुलीने सांगितले की, ती एका टीव्ही शोमध्ये पाहिलेली गोष्ट कॉपी करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: नसतं धाडस कशाला? भयंकर पूर अन् प्रवाशांनी भरलेली गाडी; ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे क्षणात सगळे गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत १३ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.हा व्हिडिओ आता पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर यूजर्स सतत कमेंट करत आहेत.