इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआय अडचणीत आले आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) मध्ये रोहित कोविड पॉझिटिव्ह आढळला. सध्या तो क्वारंटाईन आहे. दरम्यान, त्यांची मुलगी समायरा हिचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये समायरा हॉटेलच्या लॉबीमध्ये आई रितिका सजदेहसोबत दिसत आहे.

यावेळी तिला तिच्या बाबांबद्दल म्हणजेच रोहित शर्माबद्दल विचारले असता, ती अतिशय गोंडसपणे म्हणते, ‘ते आपल्या खोलीमध्ये झोपले आहेत. ते कोविड पॉझिटिव्ह आहेत. कोणीतरी एकचजण त्या खोलीत राहू शकतं.’ व्हिडीओमध्ये तिची आई आणि आयाही दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिमानास्पद! मुलाची बारावीची गुणपत्रिका प्रवाशांसोबत शेअर करताना रिक्षाचालक बापाचा आनंद गगनात मावेना

रोहित पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बोर्डासमोर दोन मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला म्हणजे त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण असेल, तर दुसरा सलामीला कोण खेळेल? काही अहवालांनुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. दुसरीकडे, मयंक अग्रवालला भारतातून इंग्लंडला पाठवण्यात आले आहे. रोहित न खेळल्यास शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल बर्मिंगहॅम कसोटीत सलामी देऊ शकतात, असेही मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित थम्ब्स-अप करताना दिसत आहे.यावरून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपर्यंत तो तंदुरुस्त होऊन खेळणार असल्याचीही चर्चा आहे.