Delhi police tweet viral: क्रिएटिव्हीटीला मर्यादा नसते, आजकाल सोशल मीडियाने प्रत्येकाला एक व्यासपीठ दिले आहे. म्हणजे प्रत्येकजण आपली क्रिएटिव्हीटी इकडे दाखवत असतो. सोशल मीडियावर नव नवीन ट्रेंड कायम व्हायरल होत असतात. नकळत आपणही त्या ट्रेंडचा भाग होतो. आता असाच एक ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या कीबोर्डवरून मीम्स बनवत आहेत.यामध्ये लोकांना कीबोर्डवरील दोन अक्षरांमध्ये काय लिहिले आहे ते वाचण्यास सांगितले जात आहे, यानंतर त्यातून काहीतरी भन्नाट मीम तयार होतो. प्रत्येकजण आता हा ट्रेंड फॉलो करताना दिसत असताना दिल्ली पोलिसांनीही या ट्रेंडची संधी सोडली नाही. त्यामुळे या ट्रेंडबरोबरच दिल्ली पोलिसांचे ट्विटही तुफान व्हायरल होतंय.

लोकांनी हा ट्रेंड आणखी मजेशीर बनवला आहे, त्यांची क्रिएटिव्हीटी वापरून ते काहीतरी तयार करत आहेत जे पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. म्हणजेच लॅपटॉपच्या कीबोर्डवरील दोन अक्षरांमध्ये हा जोक लपलेला असतो. म्हणूनच हा ट्रेंड खूप मनोरंजक होत आहे, दररोज लोक काहीतरी शोधतात ज्यामध्ये काहीतरी नवीन आणि मनोरंजक आहे.

ट्रेंड कुठे सुरू झाला?

आता सर्वप्रथम हा ट्रेंड कुठून सुरू झाला हे जाणून घेऊयात. हा ट्रेंड युई हिरासावाने सुरू केला होता, जो एनीम मालिकेचा नायक आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की कीबोर्डवर T आणि O दरम्यान पहा… यानंतर, जेव्हा लोकांनी त्यांच्यामधील अक्षरे वाचली तेव्हा त्याचे नाव YUI असे दिसून आले. आता लोक वेगवेगळ्या प्रकारे हा ट्रेंड मांडू लागले. काही लोक कीमध्ये त्यांचे नाव शोधत आहेत तर काही लोक कीबोर्ड वापरून मीम्स बनवत आहेत.

दिल्ली पोलिसांनाही फॉले केला ट्रेंड

हा ट्रेंड इतका व्हायरल झाला आहे की फूड डिलिव्हरी ॲप स्विगी आणि दिल्ली पोलिसही त्यात सामील झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, तुम्ही गाडी चालवताना कीबोर्ड पाहिल्यास चालानसोबत Q आणि R मध्ये काय आहे ते तुम्हाला दिसेल. आता कीबोर्डवर Q आणि R मध्ये पाहिल्यास, येथे WE बनते. म्हणजे पोलीस म्हणाले की आम्ही तुम्हाला चलान घेऊन भेटू.

पाहा ट्विट

हेही वाचा >> Desi Jugaad: उकाड्यापासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा ट्रकमध्ये हटके जुगाड; VIDEO पाहून चक्रावून जाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून प्रत्येकजण तो ट्राय करतोय. प्रत्येकाची क्रिएटिव्हीटी पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.