Viral Video: सोशल मीडियामुळे जगभरातील अनेक व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात. आपल्याला बसल्या जागेवरून अशा सर्व गोष्टी एका क्लिकवर पाहता येतात. सोशल मीडियावर रील्स, गाणी, डान्सचे विविध व्हायरल व्हिडीओ नेहमीच पाहतो. त्याशिवाय अनेकदा यावर भांडण, मारामारीचे तसेच गर्दीचेही व्हिडीओ व्हायरल होतात. आतादेखील असाच एक चीनमधील व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओतील ठिकाणाची तुलना मुंबईतील दादर रेल्वेस्थानकाशी करण्यात आली आहे.

मुंबईतील लोकल ट्रेन आणि दादर स्थानकावरील गर्दी पाहून नेहमीच लोक घाबरतात. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही तारेवरची कसरतच असते. आता व्हायरल होणाऱ्या चीनमधल्या या व्हिडीओमध्येही अशीच तुडुंब गर्दी पाहायला मिळतेय; ज्याचा व्हिडीओ शेअर करीत एका व्यक्तीने या ठिकाणाची तुलना दादर रेल्वेस्थानकासोबत केली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ चीनच्या ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ येथील असून, त्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेकडो लोक या ठिकाणी पायऱ्यांवर अडकल्याचे दिसत आहे. ही गर्दी पाहून तुम्हालाही दादर रेल्वेस्थानकावरील दृश्य नकळतपणे डोळ्यांसमोर तरळू लागेल.

हेही वाचा: ‘लग्न करा आज, पैसे द्या हप्त्याने’; विवाह मंगल कार्यालयाची जगावेगळी जाहिरात, Photo वर नेटकरी करतायत कमेंट्स

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही जगातील सर्वांत लांबीची भिंत असून, तिची लांबी जवळपास ६३०० किमी आहे. चीनची ही भींत २३०० वर्षांहून अधिक जुनी आहे. ही भिंत जगातील सात आश्चर्यांमध्ये गणली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ Xवरील @GodmanChikna या अकाउंटवरून शेअर करीत त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये ‘या चायनीज लोकांनी ग्रेट वॉल ऑफ चायनाला दादर स्टेशन बनवलं आहे,” असे म्हटले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास २० हजारांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय युजर्सही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “यमुनोत्रीमध्येदेखील हीच अवस्था आहे.” तर दुसऱ्यानं लिहिलंय, “ही गर्दी पाहून मला वाटलं केदारनाथ आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “बहुतेक इथे मोमोज फ्री भेटत आहेत म्हणून गर्दी केली आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “ही मुंबई लोकल ट्रेन वाटतेय.” तर, आणखी एकाने लिहिलेय, “हे चीनच्या लोकांचं दादर आहे.”