Viral news: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य यांच्यासारखेच प्रकरण समोर आले आहे. मात्र येथे प्रकरण थोडे उलटे आहे. या प्रकरणात तरुणीनं नाही तर तरुणानं धोका दिला आहे. यामध्ये तरुणाने नोकरी मिळवल्यानंतर प्रेयसीला सोडले आहे. तरुणीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचे म्हणणे आहे की, जोपर्यंत आरोपी बेरोजगार होता तोपर्यंत तो लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी संबंध ठेवत होता. पण नोकरी लागताच तो स्वतःहून दूर जाऊ लागला आणि लग्नास नकार दिला. यासंदर्भात सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.

इंस्टाग्रामवर झाली ओळख

मार्च २०२१ मध्ये अमेठी जिल्ह्यातील जामो पोलीस स्टेशन हद्दीतील रामशाहपूर गावात राहणाऱ्या आदित्य तिवारीची इंस्टाग्रामवर प्रतापगड जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी मैत्री झाली होती. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले, त्यानंतर काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर दोघांची भेट होऊ लागली आणि हे प्रकरण एकमेकांच्या लग्नापर्यंत आले. तरुणाने लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीला बऱ्याचवेळा लॉजवर नेऊन शारीरिक संबंधही ठेवले. दोन वर्षे सर्व काही ठीक चालले. दरम्यान, आरोपी तरुणाला नोकरी लागली. आणि तरुणाने प्रेयसीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली.

नोकरी लागताच प्रियसीला दिला धोका

पीडित तरुणीचा आरोप आहे की, आरोपी तरुण आदित्य तिवारी लग्नाच्या बहाण्याने दोन वर्षांपासून तिच्याशी संबंध ठेवत होता. दरम्यान, आरोपी प्रियकर आदित्यची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी निवड झाली. आणि नोकरी लागल्यावर तरुणाने प्रेयसीपासून अंतर ठेवायला सुरुवात केली.

हेही वाचा – VIDEO: वडील वारले; मजुरी करून आईनं पोराला शिकवलं; लेकानं पांग फेडलं, थेट PSI होऊनच घरी आला

दरम्यान पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करू लागला. मुलीने तिच्या घरच्यांनाही लग्न ठरवण्यासाठी आदित्यच्या घरी पाठवले, मात्र काही जमले नाही. त्यानंतर तर ती स्वतःही गेली, पण तिची निराशा झाली. यानंतर तरुणीने तरुणविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर तरुण लग्नासाठी तयार झाला मात्र काही दिवसांनी पुन्हा लग्नास नकार दिला आणि तिला खोट्या एफआयआरमध्ये अडकवण्याची धमकी दिली. आणि १५ जुलैला तरुणीविरोधात त्यानं तक्रार दाखल केली.

पुढील तपास सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, जामो पोलिस स्टेशनचे निरीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून प्रतापगड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.