आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला. या सामान्यात नवीनने चांगली कामगिरी केली होती, पण तरी सोशल मीडियावर त्याला प्रंचड ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर आंब्याचा फोटो शेअर करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीनची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर Sweet season of mangoes हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या सर्व ट्रोलिंगला वैतागून लखनऊ सुपर जायंटसने आंबा, मँगो सारखे शब्द ट्विटरवर म्युट केले आहेत. चला जाणून घेऊ या काय आहे प्रकरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंब्याचे फोटो टाकून नवीनला केलं जातंय ट्रोल

त्याचं झालं असं की, आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला आहे. या सामान्यामध्ये गौतम गंभीरच्या लखनऊ संघातील खेळाडू नवीन-उल-हकने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाजी करताना संपूर्ण संघ अपयशी ठरला. या पराभवासह लखनऊ सुपर जायंट्सचं विजेतेपदाचं स्वप्नही अपूर्ण राहिलं. या सर्व प्रकरणादरम्यान सामन्यात चांगली कमगिरी करूनही नवीन-उल-हकला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे, तेही आंब्यावरून. सोशल मीडियावर आंब्याचे फोटो टाकून नवीनला ट्रोल केलं जात आहे.

हेही वाचा – विराटशी नवीन उल हकने घेतला पंगा, आता होतोय ट्रोल, “Sweet season of mangoes”! चे भन्नाट मीम्स पाहून पोट धरुन हसाल!

हेही वाचा – धारावीची झोपडपट्टी ते आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडचा चेहरा! १४ वर्षीय मलीशा खरवाला कशी मिळाली इतकी मानाची संधी?

काय आहे प्रकरण?

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी नवीन-उल-हकचा विराट कोहलीसह वाद झाला होता. त्यानंतर जेव्हा आरसीबीचा संघ आयपीएल स्पर्धेतून बाद झाला तेव्हा नवीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर आंबे खातानाचा फोटो टाकून अप्रत्यक्षपणे त्यांची खिल्ली उडवली होती. आता हेच सर्व त्याच्यासोबत घडलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संदीप वॉरियर, विष्‍णू विनोद आणि कुमार कार्तिकेय तीन खेळाडूंनी अशाच प्रकारे आंब्याचा फोटो पोस्ट करून नवीन-उल-हकची खिल्ली उडवली आहे. त्यांनी आंब्याचा फोटो पोस्ट करून गांधीजींच्या तीन माकडांची पोज दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे नवीन-उल-हकला ‘वाईट बोलू नये, वाईट बघू नये आणि वाईट ऐकू नये’ असा सल्ला दिला आहे. दरम्यान काही वेळाने हा फोटो सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला, पण काही यूजर्सनी याचा स्क्रीनशॉट काढाला. या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करून नेटकऱ्यांनी नवीन-उल-हकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

लखनऊ सुपर जायंट्सने म्युट केले हे शब्द

सध्या हे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Sweet season of mangoes, मँगो, आंबा, आम, असे शब्द वापरून नवीन-उल-हकसह लखनऊ सुपर जायंट्सलादेखील ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगला वैतागून लखनऊ सुपर जायंट्सने ट्विटरवर Sweet season of mangoes, मँगो, आंबा, आम असे शब्द म्युट केले आहेत, जेणेकरून या शब्दावरून टॅग केल्या जाणाऱ्या पोस्टचं नोटिफिकेशन त्यांना येणार नाही. लखनऊ सुपर जायंट्सने या म्युट केलेल्या शब्दांचा स्क्रीनशॉटदेखील ट्विटरवर शेअर करून त्यांनी नेटकऱ्यांना या ट्रोलिंगकडे ते दुर्लक्ष करत असल्याचं सूचित केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow super giants mute mango sweet mango words as naveen ul haq trolled on twitter after meems viral on internet snk
First published on: 25-05-2023 at 14:22 IST