November 2025 Holidays : शाळेतील विद्यार्थी यांचा ‘सुट्ट्या’ म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. दिवाळी आणि इतर सणांसाठीच्या सुट्ट्यानंतर अनेक शाळा ३ नोव्हेंबर पासून सुरु झाल्या आहेत. असं असताना शाळकरी मुले पुन्हा शाळांना कधी मोठी सुट्टी पडणार याच विचारात आहेत. तर पालकांनो तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. नोव्हेंबर महिन्यात शाळेतील विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्टी असणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
jagranjosh.com यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये असलेल्या दीर्घ सुट्ट्यांनंतर, विद्यार्थी आता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये असणाऱ्या हिवाळी सुट्ट्यांची वाट पाहत आहेत. पण, नोव्हेंबरमध्ये सुद्धा गुरु नानक जयंती, बालदिन, गुरु तेग बहादूर जी यांचा शहीद दिन आदी अनेक दिवशी सुट्ट्या असणार आहेत. या प्रसंगी अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील शाळांच्या नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी
- ३ नोव्हेंबर २०२५ – गुरु नानक जयंती
- ५ नोव्हेंबर २०२५ – बालदिन
- २४ नोव्हेंबर २०२५- गुरु तेग बहादूर जी शहीद दिन
तसेच प्रत्येक आठवड्याचा रविवार सुद्धा या सुट्ट्यांमध्ये धरला जाईल.
गुरु नानक जयंती – गुरु नानक जयंती देशभरात साजरी केली जाते. हा दिवस शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांच्या जयंतीचे स्मरण करतो. हा दिवस पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि इतर अनेक राज्यांमध्ये एक प्रमुख उत्सव आहे.
बालदिन – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मुलांना समर्पित आहे. यादरम्यान एक दिवस आधी काही शाळांमध्ये विशेष कार्यक्रम, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
गुरु तेग बहादूर शहीद दिन – शीख धर्माच्या नवव्या गुरूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये या दिवशी शाळा आणि सरकारी कार्यालये बंद राहतात.
