लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि फार सुंदर क्षण असतो. त्यात आजकाल लग्नात काहीतरी हटके आणि स्पेशल करण्याची क्रेझ वाढताना दिसतेय. त्यासाठी नवरा-नवरी कधी रथ, घोडा, बुलेट किंवा काहीवेळा थेट हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात एन्ट्री घेतात. मात्र, एका जोडप्याने चक्क बैलगाडीमधून लग्नमंडपात एन्ट्री घेतली आहे. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत एका ओपन ग्राउंडवर लग्नसोहळा आयोजित केल्याचे दिसते आहे. यावेळी नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी चक्क सजवलेल्या बैलगाडीवर उभे राहून एन्ट्री घेत असल्याचे दिसत आहे. सनईच्या सूरात नवरदेव अन् नवरी लग्नमंडपात आले, नवरीने यावेळी नवरीच्या हातात बैलांची दोरी होती. या नवरा-नवरीने एन्ट्री घेताच उपस्थित नातेवाईक अगदी आश्चर्याने बघत होते. काही नातेवाईक त्यांच्याबरोबर चालतानाही दिसत होते. त्यावेळी नवरा-नवरी अगदी रुबाबात बैलगाडीवर उभे होते. नवरीने यावेळी महाराष्ट्राचा पारंपारिक पोशाख म्हणजे नऊवारी साडी आण त्यावर मराठमोळ्या पद्धतीचे दागिने परिधान केले होते. तर वरानेही महाराष्ट्रीय पद्धतीला साजेसा असा पोशाख घातला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@dimplinglife’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांना नवरा-नवरीची ही जबरदस्त एन्ट्री फार आवडली आहे. अनेकांनी त्यावर मस्त, भारी, एकच नंबर अशा कमेंट्स करीत व्हिडीओला पसंती दिली आहे.