VIRAL VIDEO : सिंदूर लावण्याची अशी स्टाईल पाहून लोकांना हसू आवरेना; पाहा काय आहे या व्हिडीओमध्ये !

टिव्ही मालिकांमधील काही सीन्स असे असतात की त्या प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडून जातात. अशीच एक क्रेझी क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे. या क्लिपमध्ये असं काही घडलंय की लोकांना हसू देखील आवरणं अवघड होऊ लागलंय.

man-accidentally-applies-sindoor-viral-video
(Photo: Facebook/@ColorsTV)

टिव्ही मालिकांमधील काही सीन्स असे असतात की त्या प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडून जातात. असे सीन्स मालिका संपल्यानंतर ही आठवणीत राहून जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेली एका मालिकेची ती क्लिप तुम्हाला आठवतेय का? ज्यात एक माणूस आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी चंद्राचा तुकडा तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवलं होतं? आता यापेक्षाही आणखी क्रेझी क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे. या क्लिपमध्ये असं काही घडलंय की लोकांना हसू देखील आवरणं अवघड होऊ लागलंय. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं समाधान होत नाही म्हणून नेटिझन्स हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले आहेत. नक्की असं काय घडलंय या क्लिपमध्ये, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप कलर्स टीव्ही चॅनवरील ‘थपकी प्यार की’ या मालिकेची आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्याचा तोल जाऊन तो अभिनेत्रीला सिंदूर लावण्याचा सीन शूट करण्यात आलाय. पण ज्या पद्धतीने तो अभिनेत्री सिंदूर लावतोय, हे पाहणं खरंच खूपच मजेदार आहे.

काय आहे या व्हायरल क्लिपमध्ये?

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक अभिनेत्री आरशारसमोर उभी असल्याची दिसत आहे. दरम्यान, तिचा नवरा येतो आणि ओल्या जमिनीवर त्याचा पाय घसरतो. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही सुद्धा पोटधरून हसाल. अभिनेत्याने कसं तरी स्वत:ला सावरलं. यात त्याच्या बोटांना चुकून टेबलवर ठेवलेला सिंदूर लागतो आणि सावरण्याच्या नादात सिंदूर लागलेलं बोट तो चुकून पत्नीच्या कपाळावर लागून नकळत त्याच्याकडून पत्नीला सिंदूर लागतो. फेसबुकवर हा व्हिडीओ एक मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर

या सीनच्या क्लिपने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे आणि नेटिझन्सकडून कमेंट्सचा अक्षरशः महापूर आलाय. तसंच या सीनवर वेगवेगळे मीम्स देखील शेअर होऊ लागले आहेत. या सीनवरील कमेंट्स आणि मीम्स वाचून लोक लोटपोट हसत असल्याचे दिसून येत आहेत. असं पाय घसरून पडता पडता इतकं परफेक्ट सिंदूर कसं काय लावता येतं? असा प्रश्न नेटिझन्स विचारताना दिसून येत आहेत. तसंच पाय घसरल्यानंतर स्वतःला सावरता सावरता त्याचं बोट नेमकं सिंदूरमध्येच कसं काय जातं? असाही प्रश्न नेटिझन्स विचारताना दिसून येत आहेत. ज्या पद्धतीने हा सीन दाखवण्यात आलाय, तो खऱ्या आयुष्यात इतक्या सहज घडणं अशक्य असल्याचं देखील नेटिझन्स म्हणत आहेत. या व्हायरल क्लिपची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूये.

ही व्हायरल क्लिप पाहून एका युजरने कमेंट् केलंय की, “ही क्लिप पाहून माझा खऱ्या अर्थाने दिवस सार्थकी लागला”. आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलं की, “जर तुमचा मूड ऑफ असेल तर ही क्लिप तुमचा मूड छान करू शकते.” “यापेक्षा आणखी मजेदार काहीच नाही…”, “भारतीय टीव्ही मालिका कधीच संपत नाहीत”, “या मालिकेचं काही होऊ शकत नाही” अशा प्रतिक्रिया देखील या क्लिपवर येताना दिसून येत आहेत.

ही क्लिप फेसबूकवर कलर्स टीव्हीने शेअर केली आहे. या क्लिपला आतापर्यंत १ मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी पाहिलंय. लोक या क्लिपचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man accidentally applies sindoor on womans forehead in tv soap internet cannot handle viral video prp

ताज्या बातम्या