Man Stealing Life Jacket On Indigo Flight Video : तुम्ही आतापर्यंत बस, ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहनांतून सामानाची चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. लोक प्रवासादरम्यान ट्रेनमधील चादरी, उशा पळवताना दिसतात; पण आता चक्क लोकांनी विमानालाही सोडलं नाही. इंडिगोच्या विमानात अशा प्रकारच्या चोरीची एक घटना समोर आली आहे, ज्यात एका प्रवाशाने विमानातून चक्क लाइफ जॅकेट चोरले. पण, एका सतर्क प्रवाशामुळे चोराला रंगेहाथ पकडण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

“भावा, हे बरोबर नाही, कृपया बॅग उघड”

व्हिडृीओमध्ये एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला असे म्हणताना ऐकू येतेय, “भावा, हे बरोबर नाही. कृपया बॅग उघड.” जेव्हा ती व्यक्ती बॅग उघडते, तेव्हा त्यामध्ये ती व्यक्ती लाइफ जॅकेट बाहेर काढते. ते पाहून प्रश्न विचारणारी व्यक्ती म्हणते, “हे लाइफ जॅकेट एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी वापरले जाते, ते तू चोरून घेऊन जात आहेस, हे चुकीचे आहे.” त्यावर प्रत्युत्तरात ती व्यक्ती बेजबाबदारपणे म्हणतेय, “हे ठेव ना.” त्यावर त्याला फटकारत तो सांगतो, “म्हणूनच मी ते बॅगमधून बाहेर काढले. कारण- हे कृत्य चुकीचे आहे.”

हा व्हिडीओ @travel.instaagram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत तो ६९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि एक हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक चांगलेत संतापले आहेत. अनेकांनी या कृत्यावर टीका केली.

एका युजरने लिहिले, “भावा, ही ट्रेन नाही. हे विमानात घडत नाही.” दुसऱ्याने मिश्कीलपणे म्हटले, “त्याला कदाचित हा रेनकोट वाटला असेल, जो फुकट नेता येतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानातून लाइफ जॅकेटसारख्या सुरक्षिततेच्या वस्तू चोरणे केवळ चुकीचेच नाही, तर कायद्याने गुन्हा आहे. डीजीसीए आणि एअरलाइन्सच्या नियमांनुसार, हे सुरक्षेचे उल्लंघन आहे आणि त्यासाठी ५०,००० रुपयांपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा आहे; परंतु ही घटना कोणत्या मार्गावर किंवा कोणत्या दिवशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.