Crime news: देशाची राजधानी दिल्ली हळूहळू गुन्हेगारी क्षेत्राची राजधानी बनत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. अशातच पुन्हा एकदा दिल्लीतील द्वारका येथे एका २८ वर्षीय मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

सुरक्षा रक्षकाचं थेट डोकं फोडलं

द्वारका सेक्टर ६ मधील मांगलिक अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून साहिल नावाच्या तरुणाने गार्ड सदाशिव झा यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, गार्डच्या डाव्या भुवयाला दुखापत झाली आहे. मात्र, हा सगळा प्रकार उघडकीस आला जेव्हा काही लोकांनी सुरक्षा रक्षकाला जखमी अवस्थेत पाहिले. त्यानंतर दोन तरुणांनी सुरक्षा रक्षकाला सगळा प्रकार विचारला आणि त्या तरुणाकडे जाब विचारण्यासाठी घेऊन गेले. या दरम्यान आरोपी साहिलने वाद घालण्यास सुरुवात केली, दरम्यान हा सगळा प्रकार एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

आरोपी ताब्यात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सुरक्षा रक्षक आरोपीच्या घराबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. सुरक्षा रक्षकाच्या डोक्यातून रक्त येत असून तो रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. “मला जाब विचारला तर मी परत मारेन” असं तो तरुण यावेळी बोलताना दिसत आहे. तसेच आरोपी साहिल जाब विचारणाऱ्या तरुणांना वारंवार शिवागळही करत आहे. तर आरोपीचे आई-वडिलही त्याची पाठराखन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकाची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, दुखापतीचे स्वरूप साधे आणि बोथट असून त्यावर उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “पेपर अवघड गेला सर, मला पास करा” उत्तर पत्रिकेत मथळा लिहून विद्यार्थ्यांनं ठेवल्या २०० आणि ५०० ​​च्या नोटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता साहिल दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.गार्डची तक्रार नोंदवून घेण्यात आली असून भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३४१ आणि ५०६ अंतर्गत आरोपी साहीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.