River Rafting viral video : रिव्हर राफ्टिंगचे नाव ऐकले की आपल्या मनात पाण्याच्या लाटांचे आवाज घुमू लागतात. उन्हाळ्यात, लोकांना वॉटर अॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडतात, ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंगचे नाव सर्वात वर येते. रिव्हर राफ्टिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. मात्र, पाण्यात बुडी मारणे जेवढे चांगले वाटते, तेवढीच या काळात खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान असाच एक रिव्हर राफ्टींग दरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.ऋषिकेशला येणारे पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्यायला विसरत नाहीत. रिव्हर राफ्टिंगसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. रिव्हर राफ्टिंगपूर्वी प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालायला सांगितले जाते, जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेफ्टी जॅकेट असूनही एका तरुणाचा जीव गेलाय. याचा व्हिडीओ पाहू तुम्हालाही धडकी भरेल.

आग, वीज व पाण्याशी खेळू नये. एकदा त्यासंबंधीच्या दुर्घटनेत कोणी सापडले की, त्यातून वाचणे फार कठीण होऊन बसते. रिव्हर राफ्टिंगचे नाव ऐकले की, आपल्या मनात पाण्याच्या लाटांचे आवाज घुमू लागतात. उन्हाळ्यात लोकांना वॉटर अॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडतात; ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंगचे नाव सर्वांत वर येते. रिव्हर राफ्टिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. मात्र, पाण्यात बुडी मारणे जेवढे चांगले वाटते, तेवढीच खबरदारी त्यानंतर घेणे गरजे असते. दरम्यान, असाच एक रिव्हर राफ्टिंगदरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ऋषिकेशमधील नदीवर मित्रांसोबत राफ्टिंग करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नदीच्या वेगवान प्रवाहात पडल्यानंतर तरुण बेपत्ता झाला होता. मात्र, अनेक शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे. घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीत राफ्टिंग करत असतान पाण्याच्या प्रवाहाची तीव्रताही जास्त दिसत आहे. अशातच राफ्टिंग करत असताना एक पर्यटक बोटीतून पाण्याच्या प्रवाहात पडतो. तो हात वर करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी त्याला वाचवण्याचा प्रश्नच नव्हता कारण पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, तो पर्यटक खाली पडताच काही क्षणांतच दिसेनासा झाला. अवघ्या ९ सेकंदात हे सगळं घडलं, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे रिव्हर राफ्टिंग करण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ devbhoomi.live नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.