The Taj Mahal’s Restricted Zone Video: ताजमहाल हा जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहाल हा मुघल स्थापत्यकलेचा एक चमत्कार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारतात येतात. शाहजहानने त्याची प्रिय पत्नी मुमताज महालाच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला आहे. प्रतिष्ठित ताजमहालमध्ये पाचव्या मुघल सम्राटाच्या कबरीच्या शेजारी मुमताजची कबर आहे. परंतु या ऐतिहासिक कबरचे रक्षण करण्यासाठी सामान्य लोकांसाठी प्रवेश बंद आहे. दरम्यान नुकताच एका व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने ताजमहालमधील प्रवेश बंद असलेल्या ठिकाणी शिरला आहे व्हिडीओमध्ये दिसते की, शाहजहान आणि मुमताज महलच्या कबर दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये मुघल राजा शहाजान आणि त्याच्या पत्नीच्या शांततेत विश्रांती घेणार्‍या दोन कबरींपर्यंत जाणारा गुप्त मार्ग दाखवला आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. अशा ठिकाणी जाण्याची परवानगी या व्यक्तीला कशी मिळाली असा प्रश्न अनेकांनी उपस्थित होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी काय म्हणाले(How The Internet Reacted To Rare Taj Mahal Video)

“आता २०२५ साठी बातमी आहे, ताजमहालला जगातील सर्वात सुंदर इमारतीचा किताब मिळाला आहे, अलहमदुलिल्लाह, भारताचा अभिमान, ताजमहाल,” एका वापरकर्त्याने लिहिले.

दुसऱ्या वापरकर्त्याने दावा केला की,”जेव्हा ही विशेष कबर सार्वजनिक दर्शनासाठी खुल्या होत्या तेव्हा मी आतील भाग पाहिला होता. “मी १९९४-९५ च्या सुमारास ताजमहालला भेट दिली होती आणि त्यावेळी हा परिसर जनतेसाठी खुला होता आणि आम्ही हे देखील पाहिले आहे,” असे ते म्हणाले.

जेव्हा काही वापरकर्त्यांनी क्लिपला धार्मिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आणि स्मारकाविरुद्ध नकारात्मक कमेंट केली तेव्हा अनेकांनी त्यांना समजूतदारपणे फटकारले आणि ताजमहालचे महत्त्व आणि त्याच्या अद्भुत सौंदर्याचा उल्लेख केला.

“मला माहित नाही की लोक या चमत्काराला का ट्रोल करत आहेत पण मी एकदा ताजमहालला गेलो आहे आणि निश्चितच पुन्हा जायचे आहे. ते आश्चर्यकारक, सुंदर आहे आणि त्याचा इतिहास अधिक मनमोहक आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.

ताजमहाल हे केवळ देशांतर्गत पर्यटकांद्वारे सर्वाधिक तिकीट आकारले जाणारे स्मारक आहे, दरवर्षी ३.२९ दशलक्षाहून अधिक भारतीय पर्यटक येथे येतात. भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांमध्येही ते आवडते ठिकाण आहे, एकूण पर्यटकांची संख्या ७-८ दशलक्षांपेक्षा जास्त आहे.