अयोध्येत रालल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. देशभरातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी दाखल होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज येईल. याचदरम्यान सोशल मीडियावर अयोध्येतील एक वेगळा फोटो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या नावाखाली हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक कसे ग्राहकांची लूट करतात हे समजेल.

दरम्यान, एका एक्स युजरने अयोध्येतील एका रेस्टॉरंटच्या बिलाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये चहा ५५ रुपयांना आणि टोस्ट ६५ रुपयांना विकला जात असल्याचे दिसत आहे. यावर आता युजर्स ही रामाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचे म्हणत संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा फोटो @Politics_2022_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, अयोध्या. शबरी रसोई, ५५ रुपयांचा चहा… ६५ रुपयांचा टोस्ट… ही रामाच्या नावावर लूट सुरू आहे, जमलं तर लुटा. आता बिलाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर युजर्स कमेंट्सच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिले की, तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ बनवले तर श्रद्धा कुठून येणार? प्रत्येक जण रामाच्या नावाखाली फसवणूक करण्यात व्यस्त! दुसर्‍याने लिहिले की, मग अशा ठिकाणी का जातोस? तुला कोणीही पकडून नेले नसेल. सर्विस पूर्ण हवी, पण पैसे देताना हालत खराब होते. तिसर्‍या युजने लिहिले, तिथल्या लोकांनी खूप काही दिले आहे, कमावले नाही तर खाणार कसे?