Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस बिनधास्त मगरीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. एवढ्या धोकादायक प्राण्याला बिधांस्तपणे कुणी कसं आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकतं, असं तुम्हालाही वाटेल.
व्हिडिओमध्ये, मगर आरामात पाण्यात दिसत आहे आणि तो माणूस मगरीभोवती फिरत आहे जणू त्याला कसलीही भीती नाही, घाबरणे नाही.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीच्या अगदी बाजूला आह, थोड्याचवेळात तो मगरीला खांद्यावर उचलून घेतो. मानेकडील भागाजवळ तो हात लावताना दिसत आहे. मगरीचं तोंड त्या व्यक्तीच्या दिशेने नाही आहे. जर त्या मगरीने व्यक्तीला पाहिलं असतं, ती चवताळली असती तर या व्यक्तीचं काय झालं असतं, याची कल्पनाही आपण करु शकत नाही. या मगरीचा आकार पाहिलात तर तोही खूप मोठा आहे, चुकुन जरी हा व्यक्ती मगरीच्या तावडीत सापडला असता तर त्याचा मृत्यू हा निश्चित होता. दरम्यान असे स्टंट करणं धोकादायक असून यामध्ये जीव जाण्याचीही भिती असते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ fishing.tribe नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…हे कसे शक्य आहे, मला विश्वास का बसत नाहीये. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले…व्वा, हा कसला स्टंट आहे.तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले… एक नरभक्षक एखाद्याचा मित्र कसा बनू शकतो.