पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसांच्या जास्त जवळ असतो. कुत्रा माणसाप्रमाणेच मालकाला जीव लावतो त्यामुळे अनेक जणांचं कुत्र्यावर जास्त प्रेम असतं.आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. काही जण कुत्र्यांना अगदी जीवाप्रमाणे जपतात, आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांना प्रेम देतात आणि सांभाळ करतात. तर, काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण कुत्र्यांना त्रास देतात.

प्राण्यांवर प्रेम करणारे फक्त आपल्या पाळीव कुत्र्यांचीच काळजी करतात, असं नाही. तर, इतर कुत्र्यांबद्दलही त्यांना तितकंच प्रेम असतं. कुठे जात असताना जर, एखादा कुत्रा अडचणीत दिसला तर असे लोक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात.असाच एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या जीव धोक्यात टाकून कुत्र्याला मदत केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वत: मृत्यूच्या दारात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील कोलोरॅडो येथील आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला पक्षी दिसला आणि तो त्याच्या मागे पळू लागला. यानंतर अचानक तो गोठलेल्या तलावावर धावू लागला. काही अंतर गेल्यावर तो त्या तलावात अडकतो. पाणी खूप थंड होतं आणि कुत्र्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं.या स्थितीत त्याचा मृत्यू निश्चित होता, परंतु नंतर एक अज्ञात व्यक्ती तलावात उडी मारून कुत्र्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला. त्या व्यक्तीचं नाव जेसन आहे. जेसननं सांगितलं की, त्याला माहित होतं की २ मिनिटांत त्याला कुत्र्याला घेऊन बाहेर पडावं लागेल, अन्यथा दोघांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र जेसननं स्वत:चा जी धोक्यात घालून त्या कुत्र्याचा जीव वाचवतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: बुलेटवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, दोन्ही तरुण आपटले तोंडावर अन् बुलेटलाही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका कुत्र्याला वाचवण्यासाठी एक माणूस कसा जीव धोक्यात घालतो, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. अनेकांनी तो रिट्विटही केला आहे.