प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये विषारी साप आला तर, काय होईल? याची कल्पना केलीय का कधी? इंडोनेशियामध्ये ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा भीतीदायक अनुभव गेल्याच आठवड्यात आला पण सुदैवानं एक धाडसी तरूण मदतीला धावून आला आणि त्यानं या सापाला मारलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडोनेशियाची राजधानी जकार्तावरून बोगोरकडे निघालेल्या ट्रेनमध्ये प्रवासी खचाखच भरले होते. ऐन गर्दीच्या वेळी सामान ठेवण्याच्या कप्प्यामध्ये मोठा साप प्रवाशांना दिसला आणि गाडीत प्रवाशांचा भीतीनं अक्षरश: गोंधळ माजला होता, कोणतीही दुर्घटना घडू म्हणून ट्रेन थांबवण्यात आली. अशावेळी एक धाडसी तरूण पुढे येऊन त्याने हातनं या सापाला पकडून मारलं. एका प्रवाशाच्या बॅगमधून चुकून हा साप आला असल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्यानं सांगितलं. या सापामुळे कोणालाही इजा पोहोचली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed snake with bare hands is internet hero
First published on: 23-11-2017 at 15:11 IST