scorecardresearch

राहायला घर नाही; मग तरुणानं असं काही केलं की थेट कारागृहात मिळाली खोली

मुंबई, पुणे, बँगलोरसारख्या गजबजलेल्या शहरात, तुमच्या आवडीचे भाड्याचे घर शोधणे खूप अवघड आहे. शेवटी तरुणानं असं काही केलं की त्याला थेट कारागृहातच खोली मिळाली.

viral post
कारागृहात घेतली भाड्याने खोली(Photo-Twitter)

शहर एक एसं ठिकाण आहे जिथं तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण जागेची कमतरता हे दुखणं अगदी पहिल्या ते शेवटच्या अशा सर्व माणसांच्या नशिबी आहे. मुंबई, पुणे, बँगलोरसारख्या गजबजलेल्या शहरात, तुमच्या आवडीचे भाड्याचे घर शोधणे खूप अवघड आहे. लाखो लोक गावाकडून अनेक स्वप्न घेऊन शहरात येतात. यावेळी राहायचं कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. भाड्यानं घर घेतलं तरी हवं तस घर मिळत नाही. असाच एक तरुण बँगलोरसारख्या शहरात येतो. मात्र राहण्यासाठी घर काही मिळत नाही मग शेवटी तो चक्क कारागृहात भाड्यानं खोली घेतली आहे.

कारागृहात घेतली भाड्याने खोली –

मंथन गुप्ता या ट्विटर वापरकर्त्याने एका छोट्या जागेचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक बेड, एक लहान कपाट आणि एक टेबल आहे. अतिशय छोटीशी ही खोली दिसत आहे. मंथन यांनी या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, “शेवटी बेंगळुरूमध्ये पूर्ण सुसज्ज घर मिळाले.मात्र त्या फोटोमध्ये दिसणाऱ्या दरवाजावरुन नेटकऱ्यांनी ही जेलमधली खोली असल्याचं ओळखलं आणि आता नेटकरी अनेक विनोदी प्रतिक्रिया यावर देत आहेत.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – Video Viral: ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्‍कर्टमध्ये मेट्रोत दिसली; नाही ही ‘उर्फी’ नाही…

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत याला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:54 IST

संबंधित बातम्या