Man Seen Eating Bread Soaked In Water viral video : संकट किंवा अडचणी कुणालाही चुकल्या नाहीत. आयुष्य जगताना संघर्ष हा करावाच लागतो. मग तो नोकरी मिळवण्यासाठी असो वा काहीतरी मोठं करण्यासाठी… यांत अनेकांवर कठीण परिस्थितीशी झुंज देत स्वत:सह कुटुंबाचे पोट भरण्याचीही एक मोठी जबाबदारी असते. कित्येकांना गरिबीमुळे पोटाच्या दोन वेळच्या भुकेसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते; पण गरीब अन् त्यात शिक्षण नसले, तर काम मिळणेही कठीण होते. अशा वेळी जे मिळेल ते खाऊन पोट भरण्याची वेळी काही लोकांवर येते. सध्या अशाच एका व्यक्तीचा मनात दया उत्पन्न करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
पोट भरण्यासाठी रस्त्यावर सुकलेली पोळी खाणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही मन हेलावून जाईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याशेजारी एक व्यक्ती बसलेली दिसत आहे; जी पोट भरण्यासाठी कडक पोळी नळाच्या पाण्याखाली भिजवते आणि मग खातेय. परिस्थितीमुळे लोकांना काय करावे लागते याचे हे खूप करुण अन् हृदयद्रावक दृश्य आहे. पोटाची भूक मिटवण्यासाठीची त्याची ही धडपड खरंच डोळ्यांतून पाणी आणणारी आहे.
VIDEO : “रघुपती राघव राजा राम” युरोपियन नागरिकाने नाचत हटके स्टाइलने गायले रामाचे भजन
हा हृदयद्रावक व्हिडीओ @Sarvagy_ नावाच्या सोशल मीडिया X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘एक गरीब माणूस आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी स्वतः सुकलेली चपातीही खातो. पैसे कमावण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि शेवटी मुलं बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं.’ हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यावर लोकही विविध कमेंट्स करीत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, ‘देवा, कृपा करून असा दिवस कोणाला दाखवू नकोस.‘ त्यासह इतर युजर्सनीही भावनिक इमोजी शेअर केल्या आहेत.