घरात किंवा ऑफिसमध्ये कुठल्याही छोट्या पार्टीत समोसे असणे ही एक कॉमन गोष्ट आहे. लहान मुले असोत किंवा म्हातारी, सगळेच मोठ्या आवडीने समोसे खातात. पण आता इथून पुढे समोसा खाताना तुम्हीही दहा वेळा विचार कराल. त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून खाद्यपदार्थांमध्ये पाल सापडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान आता चक्क समोश्यामध्ये पाल आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल..

हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील हापूर येथून समोर आला आहे. एका व्यक्तीनं हापूर येथील एका दुकानातून समोसे खरेदी केले होते. हे समोसे खाल्ल्यानंतर या व्यक्तीची १३ वर्षांची मुलगीही आजारी पडली असून तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी पोलीसात तक्रार केली असता दुकानमालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने समोसा खाताच त्यामध्ये पाल आढळली. त्यानंतर त्यानं लगेच पाण्यानं चूळ भरायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे समोस्यामध्ये मृत असलेली पाल दिसत आहे. हा किळसवाणा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुत्र्याच्या पिल्लांनी दुधवाल्याचं केलं चांगलंच नुकसान; VIDEO पाहून म्हणाल हसावं का रडावं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक संतापजनक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @princysahujst7 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.