मुंबईची लोकल ट्रेन तिच्या गर्दीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. महिला असो की पुरुष आणि तरुण, मुंबई लोकलमध्ये चढणे हे प्रत्येकासाठी एखाद्या कामापेक्षा कमी नाही. होय, मुंबईच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी मुंबईकर लोकल ट्रेनचाच वापर करतात. त्यामुळे लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन असेही म्हणतात. पण भाऊ… मुंबई लोकलमध्ये फक्त बसण्याची आणि उभ राहण्याची जागा असते. अनेकजण सीटवरच डुलकी घेतात. पण एकाने चक्क लोकल ट्रेनमध्ये झोपण्याची जागा शोधली आणि तो झोपलाही. या व्यक्तीचा लोकलमध्ये झोपलेला फोटो आता सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला.

व्हायरल झालेल्या या फोटो मध्ये लोकल ट्रेनच्या डब्यात एक तरुण समान ठेवतात तिकडे झोपलेला दिसत आहे. त्याने जीन्स आणि टी-शर्ट घातला आहे. डोळे शर्ट आणि निळ्या कपड्याने झाकलेले दिसत आहे. तो अत्यंत शांतपणे झोपलेला दिसत आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की सामानाच्या रॅकवर झोपणे ही देखील एक कला आहे! तर दुसरीकडे या तरुणाला पाहून इतर प्रवाशांनाही धक्का बसला आहे.

Loksatta vyaktivedh Vitthal Shanbhag Ranichi Bagh at Byculla Mumbai Jijamata Park
व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

हा फोटो /Radiant_Commercial56 नावाच्या वापरकर्त्याने Reddit वर शेअर केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते – खरे सांगायचे तर, यामुळे मला थोडा हेवा वाटतो! या फोटोला आतापर्यंत शेकडो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तसेच हा फोटो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केले जात आहे, जे पाहून मुंबईकरही गोंधळले.

(हे ही वाचा: वराने वरमाळा घालताच, वधूने मारली कानाखाली आणि…; Video Viral)

(फोटो: u/Radiant_Commercial56)

(हे ही वाचा: Viral: लिंबाच्या वाढलेल्या किमतीवर भाजीवाल्याने बनवलं भन्नाट गाणं! Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ)

हा फोटो पाहिल्यानंतर शेकडो युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काही जणांनी त्या व्यक्तीला सामानाच्या रॅकवर झोपलेले पाहून विचारले की तो कुठून आला आहे. तर काहींनी त्याच्या जागेला स्वस्तला कोच म्हटले. त्याच वेळी काही वापरकर्त्यांनी लिहिले – हे धोकादायक आहे. तुम्हाला हा देसी जुगाड कसा वाटला?