Train Passenger Viral Video: देशात सर्वाधिक सर्वसामान्य नागरिक हे रेल्वेने प्रवास करतात. देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणे सुरक्षित, सोईचे व परवडणारे वाटते. सोशल मिडियावर बऱ्याचदा रेल्वेतील भांडणाचे, हाणामारीचे अशा अनेकविध प्रकारच्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा रेल्वेतील एक व्हिडीओ समोर आला आहे. पण, हा व्हिडीओ पाहून सर्व लोक थक्कच झाले आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

रेल्वेतून अनेकदा काही प्रवासी आरक्षण किंवा तिकीट न घेताच ट्रेनमधून प्रवास करत असतात. काही वेळा ते टीटीईच्या नजरेतून सुटतात, तर कधी त्यांना पकडलंही जातं. अशाच काही भन्नाट प्रकारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात, जे पाहून लोकांचे डोळे विस्फारले जातात आणि हसूही आवरत नाही. सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका रेल्वे प्रवाशाने विनातिकीट प्रवास करूनसुद्धा कसा दंड टाळला हे पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि हसूही आवरणार नाही. हा प्रसंग इतका वेगळा आणि मजेशीर आहे की, पाहणारा प्रत्येक जण एकतर डोकं धरतोय नाहीतर पोट धरून हसतोय.

नेमकं काय आहे व्हिडीओत?

व्हिडीओमध्ये दिसतं की, ट्रेन स्थानकावर थांबते आणि प्रवासी खाली उतरू लागतात. त्या गर्दीत एक प्रवासीदेखील उतरतो, पण त्याची उतरायची पद्धत अगदीच वेगळी आहे. तो अगदी दिव्यांगासारखा चालू लागतो, पाय वाकडे करत, झुकत आणि वेगळ्या हालचाली करत. पाहणाऱ्याला वाटेल की तो खरंच अपंग आहे.

पण गंमत इथेच आहे, या साऱ्या नाट्याचा हेतू असतो TTE म्हणजेच तिकीट तपासनीसापासून बचाव. कारण टीटीई बहुतेक वेळा दिव्यांगांना सहजपणे जाऊ देतो. याचाच फायदा घेत तो प्रवासी अभिनय करत पुढे सरकतो. पण, ज्या क्षणी त्याला खात्री पटते की आसपास कुठेही TTE नाही, तेव्हा अचानक तो ‘अपंगत्व’ विसरून फुल स्पीडने पळायला लागतो. ही क्षणभरातली बदललेली परिस्थिती पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसतो.

येथे पाहा व्हिडीओ

लोकांच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले असून, नेटिझन्सनी कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. अनेकांनी याला “जुगाडू जीनियस!”, “TTE चा गेमच उडवला”, “हा तर ऑस्कर मिळवण्यास पात्र आहे” अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वरील @gharkekalesh या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, आता तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान गाजतोय.