सेल्फीच्या वेडासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. अगदी बॅनरसोबत देखील सेल्फी काढायला मागे पुढे बघायचे नाही अशीच गत सेल्फीवेड्यांनी झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर मगरीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न एका महिलेने केला होता. या महिलेवर मगरीने हल्लाही केला, शेवटी वनरक्षकांनी तिला रुग्णालयात भरती केले होते. एवढे लांबचेही जाऊ दे राजस्थानमध्ये तर एका सेल्फीवेड्याने चक्क अजगरासोबत सेल्फी घेण्याचे धाडस केले होते, अखेर अजगरानेही त्याला असा इंगा दाखवला की आता आयुष्यात कधी सेल्फी घेण्याचा विचारही तो मनातही आणणार नाही हे नक्की. त्यामुळे अशा महाभागांचे व्हिडिओ किंवा फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. अशात आणखी एक फोटो वेगवेगळ्या फेसबुक पेज आणि व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहे.
Viral : धगधगत्या तेलाच्या विहीरीसोबत ‘त्याचा’ सेल्फी घेण्याचा प्रयत्न
आलियाच्या पोस्टर सोबत काढलेला एका व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. आलिया भट्ट हिच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कोणाला नाही होणार म्हणा. आता तिच्यासोबत प्रत्यक्ष सेल्फी काढण्याचा योग येईल न येईल तेव्हा तिच्या पोस्टरसोबतच सेल्फी काढू असे या व्यक्तीच्या मनात आले असेल, त्यामुळे वेळ न दवडता या व्यक्तीने हटके स्टाईलमध्ये तिच्यासोबत फोटो काढला. पण हा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की चुकून त्या व्यक्तीने हा फोटो पाहिला तर कशाला नको तो शहणपणा मी केला असे वाटल्याशिवाय त्याला राहणार नाही हे नक्की. अभिनेत्री आलिया भट्टच्या मोबाईल फोनच्या जाहिरातीचे पोस्टर एका रस्त्यावर लावले होते, त्यासोबत एका व्यक्तीने मजा म्हणून फोटा काढला. आता हा फोटो दिसतानाच एवढा मजेशीर दिसतोय की तो व्हायरल झाला नाही तर नवलच!