Train viral video: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या विचित्र व अनोख्या घटनांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका प्रवाशाने ट्रेनच्या शौचालयाचे रुपांतर स्वतःच्या वैयक्तिक बेडरूममध्ये केलेले दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक हसले असले तरी काही जण सार्वजनिक स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
व्हिडीओ कंटेंट क्रिएटर विशालने रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असताना ही विचित्र घटना कैद केली. व्हिडीओमध्ये प्रवासी त्याचे सामान घेऊन ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आरामात झोपलेला दिसतोय. तो शौचालयाच्या खिडकीतून एक दुमडलेला बेड उचलतो, ज्यामुळे एक तात्पुरती बेडरूम दिसते. विशाल हिंदीत म्हणतो, “भावाने वॉशरूम भोजपुरी बनवला,” आणि नंतर प्रवाशाला विचारतो, “हे सर्व घरातील सामान आहे का? प्रवासी हसत हसत उत्तर देतो, ‘हो’ आणि त्याच्या तात्पुरत्या व्यवस्थेची पुष्टी करतो. व्हिडीओला ‘ट्रेनचे शौचालय बेडरूममध्ये बदलले’ असे कॅप्शन दिले आहे.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना ही घटना मजेशीर वाटली, तर काहींनी सार्वजनिक स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली. एकाने प्रतिक्रिया देत म्हटले, तो खरोखर प्रवासाचा आनंद घेत आहे, तर काहींना उभे राहून त्रास होत आहे,” तर काहींनी म्हटले, “अधिकाऱ्यांनी त्याला पुढच्या स्टेशनवर उतरवावे.” या घटनेमुळे भारतीय रेल्वेतील जागेची कमतरता आणि सार्वजनिक सुविधा कशा वापरल्या जात आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, इन्स्टाग्रामवर त्याला ७,८०,००० हून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. प्रवाशाच्या अनोख्या शैलीने अनेकांना आश्चर्य वाटले आहे, तर काही जण या घटनेला सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन मानतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये जागेची टंचाई आणि आराम मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा उठतेय.
सार्वजनिक शौचालयांचा वापर केवळ मूळ उद्देशासाठीच करावा, असा संदेश सोशल मीडियावर अनेकांनी दिला आहे, तरीही प्रवाशांच्या क्रिएटिव्ह उपायाची ही घटना लोकांच्या लक्षात राहणारी ठरली आहे.
