कधी कोणाच्या नशीबात काय लिहिले आहे हे कोणी सांगू शकत नाही. अनेकदा काही लोकांचे नशीबाचे दार उघडते आणि अचानक त्यांना धनलाभ होतो. हे फक्त चित्रपटात नव्हे तर खऱ्या आयुष्यातही घडते. वडिलधारी मंडळी नेहमी आपल्याला बचत करण्याचा आणि योग्य गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात पण अनेकदा आपण सर्वजण त्याकडे दुर्लक्ष करतो. योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे असते हे पटवून देणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या वडिलांनी ३० वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आज त्याला झाला आहे.

शेअर खरेदी-विक्रीच्या प्रकरणामध्ये असे अनेकदा घडले आहे. काही वर्षांपूर्वी खरेदी केलेला एखाद्या शेअरची किंमत आज कोटींमध्ये असते. असा शेअर एखाद्याला सापडल्याचे एक प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. अलीकडेच, एका व्यक्तीला १९९० च्या दशकात त्याच्या वडिलांनी खरेदी केलेल्या १ लाख रुपयांच्या जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सचे प्रमाणपत्र सापडले आणि एका रात्रीत त्याचे आयुष्य बदलले. या शेअर्सची किंमत आज कोटींमध्ये आहेत. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.
आता खरेदी करा, विसरून जा आणि नंतर विका

सौरव दत्ता नावाच्या व्यक्तीने X (ट्विटर) वर पोस्ट केली ज्यामध्ये ‘रेडिटवर एका व्यक्तीची पोस्ट दिसत होती ज्यानुसार , “त्याला त्याच्या वडिलांनी १९९० च्या दशकात खरेदी केलेले १ लाख रुपयांचे शेअर्स सापडले आहेत.” त्याने या शेअर्सची मूळ प्रमाणपत्रे देखील शेअर केली आहेत. ही प्रमाणपत्रे जिंदाल विजयनगर स्टीलने जारी केली होती.

शेअर बाजाराची माहिती असलेल्या सौरव दत्ता यांनी या शेअर्सची सध्याची किंमत मोजली आणि त्यांनी सांगितलेल्या रकमेवर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यांनी लिहिले, ‘आज त्यांची किंमत ८० कोटी रुपये आहे.’ हे वाचून अनेकांना धक्काच बसला.

त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक अतिशय मनोरंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली ‘आता खरेदी करा, ३० वर्षांनी विकण्याची शक्ती पाहा”

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचा शेअरची १०११.२० रुपये आहे (९ जून २०२५).

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले – हाच खरा वारसा आहे.

सध्या स्टॉक, क्रिप्टो किंवा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना या पोस्टवर खूप कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या शक्तीबद्दल मत मांडले आहे तर काहींनी म्हटले की,”केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात परतावा देईल.”

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने शेअर्सच्या किंमतीच्या उत्तरात लिहिले की, ‘८० कोटी रुपयांचे शेअर्स रिडीम करण्यासाठी किती कर आकारला जाईल?’

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘मला जिंदाल विजयनगर स्टीलचा आयपीओ आठवतो. तो १९९० च्या उत्तरार्धात आला होता. काय दिवस होते ते.’

एका वापरकर्त्याने लिहिले, ‘मुख्य मुद्द्यापासून विचलित होण्याची गरज नाही, १९९० च्या दशकात जो व्यक्ती एका स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवू शकत होता तो खूप श्रीमंत व्यक्ती होता. माझ्या वडिलांचा मासिक पगार १९९३ मध्ये ८०० रुपये होता आणि आता आम्ही चांगले काम करत आहोत, आम्ही गरीब नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर सौरव दत्ता म्हणाले, ‘मला हे समजते. पण जरी तुम्ही सुरुवातीची गुंतवणूक ९० टक्क्यांनी कमी करून फक्त १०,००० रुपये केली, जी वार्षिक पगाराच्या बरोबरीची आहे, तरी त्याचे मूल्य आज ८ कोटी रुपये असेल. जे आज खूप मोठी रक्कम आहे.