Bike Spare Parts Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो. तर कोणी जुगाड करून विटांपासून कूलर बनवतं. आता अशाच प्रकारचा एक नवा जुगाडू व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत. एका तरुणाने देशी जुगाड करून असं काही बनवलं आहे, जे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका तरुणाने दुचाकीचे स्पेअर पार्ट्स वापरून एक भन्नाट खूर्ची बनवली आहे. देशी जुगाड करून बनवलेल्या खूर्चीची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती खूर्चीवर बसून दुचाकीच्या दुरुस्तीचं काम करतो. परंतु, तो ज्या खूर्चीवर बसला आहे, त्या खूर्चीची तुफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. कारण ही एक सामान्य खूर्ची नसून जुगाडू खूर्ची आहे. ही खूर्ची बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीचे स्पेअर पार्ट्स म्हणजेच डिस्क ब्रेक, शॉकर, लोखंडी रॉड आणि नटबोल्टचा वापर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, हा तरुण या खूर्चीवर किती आरामात बसून त्याचं काम करत आहे.

नक्की वाचा – देशी जुगाड करून बनवली पायंडल नसलेली अनोखी सायकल, भन्नाट Video पाहून लोक चक्रावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@soypercy1 नावाच्या यूजरने जुगाडाचा हा जबरदस्त व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी ४५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. लोक या खूर्चील खरेदी करण्याची मागणी सुद्धा करत आहेत. तरुणाने बनवलेल्या जुगाडू खूर्चीचा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.