सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. आतापर्यंत तुम्ही भररस्त्यात तुफान हाणामारी करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आतापर्यंत व्हायरल होणाऱ्या मारामारीच्या व्हिडीओंमध्ये एखादी रागात असलेली व्यक्ती काही मिळेल ती वस्तू समोरच्या व्यक्तीला फेकून मारताना पाहिले असेल. पण नुकत्याच व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मारामारी करण्यासाठी एक अशी काही वस्तू वापरतेय जी पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सापाचे नाव काढले तरी मनात एक भीती निर्माण होते. यामुळे सापापासून प्रत्येक जण दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पायाखालून चुकून जरी कधी साप गेला तर दोन दिवस आपल्याला नीट झोप लागत नाही. सापाबद्दल एवढी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. पण याच सापाच्या साह्याने जर कोणाला मारहाण केल्याचे म्हटले तर तुम्हाला खरे वाटेल का? नाही ना. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती सापाला अगदी पट्ट्याप्रमाणे हातात पकडून दुसऱ्याला व्यक्तीला मारहाण करत आहे. या व्यक्तीच्या हातातील साप आधी पट्टा असल्याप्रमाणे दिसतोय, पण जेव्हा तो हातातील साप खाली फेकतो तेव्हा समजते की तो पट्टा नाही तर चक्क साप आहे.
सापाचा हा थरारक व्हिडीओ @crazyclipsonly या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन व्यक्तींचे भररस्त्यात कशावरून तरी भांडण झाले. या वेळी दोघांमधील एका व्यक्तीने सापाचा पट्टा म्हणून वापर करत दुसऱ्या व्यक्तीला जब्बर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी समोरची व्यक्ती स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही एक व्यक्ती सापाच्या मदतीने त्याला मारत सुटते. मारहाण करत ती व्यक्तीला जमिनीवर पडते. सुदैवाने तेवढ्यातच पोलिसांची एक गाडी येते. त्या माणसाच्या हातात साप पाहून पोलीसही आश्चर्यचकित होतात. या वेळी पोलीस कसेतरी दोघांचे भांडण सोडवतात. या वेळी ती व्यक्ती आपल्या हातातील साप खाली फोकते, खाली पडताच साप रस्त्यावरून सरपटत निघून जातो.
रस्त्यावर उभे राहून दोघांचे भांडण पाहणाऱ्या एक व्यक्तीने आपल्या मोबाइलने या घटनेचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो आता खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, टोरंटोमधील रस्त्यावरील हाणामारीदरम्यान एका व्यक्तीने पाळलेल्या सापाचा शस्त्र म्हणून वापर केला. या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.