दुचाकी चालवण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असते, हे आपणा सर्वांना माहीती आहे. मात्र, काही लोक असे आहेत की जे हेल्मेटशिवाय बाहेर पडतात आणि नंतर वाहतूक पोलिसांपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात. कारण वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंड भरावा लागणार हे माहिती असतं. त्यामुळे अशा लोकांनी पोलिसांपासून लपत लपत जावं लाते. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून पोलिसांनीदेखील डोक्याला हात लावला असेल यात शंका नाही. हो कारण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरुणाने हेल्मेटला पर्याय म्हणून एक जुगाड शोधून काढलं आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

देशी जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील तरुणाने हेल्मेटला अप्रतिम असा पर्याय शोधल्याचं पाहायला मिळत आहे. हा तरुण एका दुकानात जातो आणि त्यांच्याकडून दोन पाईप्सना जोडणारा प्लास्टिकचा एक मोठा कनेक्टर घेतो आणि तो चक्क हेल्मेटप्रमाणे डोक्यावर घालतो. आश्चर्याची बाब म्हणजे तो पाईपचा तुकडा डोक्यात घालून बाईकदेखील चालवताना दिसत आहे.

हेही पाहा- वडिलांनी मोबाईल घेतला, रागवलेला मुलगा १७ व्या मजल्याला लटकला अन्…, अंगावर शहारा आणणारा Video Viral

हेही पाहा- मेट्रोत सर्व प्रवांशासमोर तरुणाने केलेल्या विचित्र स्टंटचा Video व्हायरल, उशी चादर घेऊन आला अन्…

पण या तरुणाने हेल्मेटला पर्याय म्हणून जरी पाईप कनेक्टर घातला असला तरीही पोलिस याला दंड करणार नाहीत का? असा प्रश्न काही लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विचारला आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, हा जुगाड पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटेल की, याला दंड कशासाठी करायचा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ bawandarbehari नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे, तर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये ‘कुठून येतात असले पराक्रमी लोकं’ असं लिहिलं आहे.