आजकालच्या जगात नोकरी करणे आणि पैसा कमावणे या गोष्टीला फार महत्व दिले जाते. त्यामुळे घरातील कामांचे महत्त्व फार कमी झाले आहे. अनेक लोक घरातील काम शिकण्याचा प्रयत्न करत नाही ना कोणालाही घरातील कामे करण्याची फारशी इच्छा असते. पण घराकाम कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी काही काम अशी असतात जी टाळतात येत नाही. आपल्याला रोज जेवण करावे लागते त्यामुळे रोजची जेवणाची भांडी ही प्रत्येकाला घासावी लागतात. स्वयंपाक घरी बनवला तर ही भांडी आणखी वाढतात. जेवण बाहेरून मागवले तरी कमीत कमी जेवणाचे ताट वाटी ग्लास तर स्वच्छ करावाला लागतो. पण काही लोंकाना या कामाचा देखील कंटाळा असतो. अशाच एका भांडी घासण्यासाठी कंटाळा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. भांडी घासावी लागू नये म्हणून पठ्ठ्याने असा जुगाड शोधला आहे जो पाहून नेटकरी चक्रावले आहेत. हा व्हिडीओ बिझनेसमन हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे.

हर्ष गोयंका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांबरोबर ते नेहमी मजेशीर, आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी गोष्टी शेअर करतात. भांडी घासण्याचे काम टाळणाऱ्या व्यक्तीने त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भांडी घासण्याच्या काम टाळण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती स्वत:च्या ताटात वाढतो आहे पण त्याला जेवल्यानंतर भांडी घासावी लागतील असे लक्षात येते मग आपले जेवणाचे ताट आणि चमचा तो प्लास्टिकने झाकतो त्यावर जेवण वाढतो. जेवण करून झाल्यावर तो प्लास्टिक काढून कचऱ्यात टाकून देतो आणि भांडी पुन्हा मांडणीवर ठेवून देतो. व्हिडीओ एक्सवर शेअर करताना हर्ष गोएंका यांनी गंमतीने लिहिले की, “जेव्हा तुमच्याकडे भांडी घासण्यासाठी पुरेसे पाणी नसते तेव्हा.”

हेही वाचा – न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral

हेही वाचा –“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत येत आहे. व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना हा जुगाड करण्याची इच्छा होत आहे.
“मी हे माझ्या वसतिगृहाच्या दिवसात केले. आमच्याकडे पाणीपुरवठा नव्हता आणि माझ्याकडे मर्यादित अन्न उपलब्ध होते,” असे एकाने कमेंटमध्ये सांगितले. दुसरा म्हणाला, “खूप मनोरंजक आहे. फूड ग्रेड प्लास्टिकचे कौतुक केले जाईल. कदाचित कोणीतरी असा उपाय शोधून काढावा. वापरा आणि फेका, किफायतशीर.”

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


आणखी एकजण म्हणाला, “हे पर्यावरणासाठी खूप हानिकारक असेल.” दुसरा म्हणाला, “अन्न खाण्याचा सर्वात अस्वास्थ्यकर आणि अनादर करणारा मार्ग. मला वाटते आहे की अशा प्रकारे कोणीही अन्न खाऊ नये.” एक्सवर हा व्हिडिओ ७२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि व्हायरल होत आहे.