Marathi Bhasha Din 2024 Wishes: मराठी म्हणजे काय हो? म्हटली तर फक्त भाषा, समजली तर एक वेगळी ओळख! कुणाची माय मराठी, कुणाचं प्रेम मराठी, कुणाचा राग मराठी, कुणाचा मान मराठी, कुणाची शान मराठी, आजीची माया मराठी, बाबांचा कणा मराठी, आईची हाक मराठी, भावंडासारखी साथ मराठी.. तीन अक्षरांच्या या शब्दाचा प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्थ आहे. आणि या सगळ्या अर्थांचा गौरव करण्याचा आजचा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारीला जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा आहे. अलीकडे कोणताही सण हा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, मग आज आपल्या भाषेला समर्पित या दिवसाच्या खास शुभेच्छा द्यायला हव्याच हो ना?
आम्ही आपल्यासाठी आज खास मराठी भाषा दिन विशेष शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत. जे आपण Whatsapp Status, Instagram Post, Stories, Facebook किंवा थेट मेसेज करून या इतरांसह शेअर करू शकता. खास म्हणजे ही सर्व भन्नाट शुभेच्छापत्र आपण फ्री डाउनलोड करू शकता. त्यामुळे अजिबात वाट न पाहता तुम्हाला आवडेल ती HD Image, Greeting सेव्ह करा.
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तर मंडळी, पुन्हा एकदा लोकसत्ता. कॉम तर्फे आपल्याला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज प्रयोग म्हणून संपूर्ण दिवस मराठीत संभाषणाचा प्रयोग करून पाहू शकता. तुमचा हा प्रयोग यशस्वी होतोय का, नक्की कळवा.