सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. कुटुंबीयांकडून काही दिवस डान्सचा सराव केला जातो आणि लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर सादर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून वधूच्या लग्नातील प्रवेशाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, नातेवाईक आणि वधूने जबरदस्त एन्ट्री मारली आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी वधूची वाट पाहात असतात. दरम्यान अचानक ‘दिल लेना, दिल देना की सौदा खरा खरा’ गाणं वाजू लागतं. गाण्याबरोबरच वधूचे कुटुंबीय एक एक करत नाचत बाहेर येतात. शेवटी वधूची दमदार एन्ट्री होते. ती येताच तिच्यासोबत सर्व नातेवाईक एकत्र नाचू लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ ९ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला असून वेगाने व्हायरल होत आहे. वधूचा डान्स पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, आमच्या लग्नात आम्ही अशीच एन्ट्री घेऊ, मस्त डान्स केला. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, क्या बात है! खरंच छान एन्ट्री घेतली.