मुंबई मॅटर्झ या ट्विटर युजरने, रस्त्यावर, बाईकवर बसलेल्या लहान मुलासोबत सेल्फी काढणाऱ्या माणसाचा फोटो शेअर केल्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी लगेच प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्यक्तीने हेल्मेट घातले नाही किंवा इतर वाहनांना रस्ता दिला नाही, असे या युजरने सांगितले. “कायद्याची अशी थट्टा…@sanjayp_1 सर…आजकाल @mumbaipolice @MTPHereToHelp ला कोणीही घाबरत नाही आणि त्यांचा आदरही करत ​​नाही.

“माहीमच्या TH कटारिया मार्गाच्या #WrongSide वर MH01DC4597 या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराने रस्ता सोडण्यास नकार दिला आणि ‘बुलाओ पोलिस को…’ म्हणत हसून सेल्फी घेण्यास सुरुवात केली.” असे या युजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीने सांगितले की, फोटोमध्ये दिसणार्‍या व्यक्तीला लवकरच चलन पाठवले जाईल. मुंबई मॅटर्झच्या ट्विटवर पोलिसांनी एक भन्नाट उत्तर दिलंय. पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “आता त्याने बोलावलंय तर जावंच लागेल. मौका भी हैं… कानून भी! आमचे चलान लवकरच त्याला मिळेल.’

पोलिसांच्या प्रतिसादाने काही वापरकर्ते आश्चर्यचकित झाले, तर काहींनी त्या व्यक्तीचे समर्थन केले की त्याने फक्त एका मुलासोबत सेल्फी घेतला.
एका वापरकर्त्याने लिहिले, “कृपया सर्व ट्विटर तक्रारींची चलन प्रत शेअर करावी.” “तो बाईक चालवत आहे असे वाटत नाही. तर इतर वाहनेही रस्त्याच्या कडेला उभी आहेत,” असे दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी दिली.

“आपल्या जीन्समध्ये काहीतरी चुकीचे आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या देशातील कायदे मोडण्याचा अभिमान वाटतो… तसे करताना आपल्याला लाजही वाटत नाही… आणि जेव्हा आपण बाहेरगावी जातो, तेव्हा आपण पूर्णपणे कायद्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतो,” एका युजरने लिहले.