Viral video: दैनंदिन जीवनात जंक फूड खाण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आजकाल अनेकजण मोठ्या आवडीने पिझ्झा, बर्गर फ्रेंच फ्राईजसारखे जंक फूड खात असतात. पण तुम्ही खाता ते पदार्थ स्वच्छ आहेत की नाही? याची काळजी घेणं खूप गरेजचं आहे. हो कारण सध्या मॅकडोनाल्डमधला एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्ही यापुढे फ्रेंच फ्राईज खाताना शंभर वेळा विचार कराल

जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक फूडी लोक मिळतील. लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला खूप आवडतात. खास करुन फास्ट फूड. निरनिराळ्या ठिकाणचे फास्ट फूड लोक आवडीनं चाखतात. कुठेही बाहेर गेल्यावर लोक हमखास पिझ्झा, बर्गर, नूडल्स मागवतात. मात्र हे चमचमीत वाटणारे पदार्थ कसे बनवले जातात पाहिलं तर पुन्हा त्यांना हात लावण्याचीही इच्छा होणार नाही. आपल्यापैकी अनेकजण नावाजलेल्या ब्रॅंडचे खाद्यपदार्थ डोळे झाकून खात असतात, पण हे खूप धोकादायक ठरु शकतं. सध्या मॅकडोनाल्डमधला समोर आलेला व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही पुन्हा त्याला हातही लावणार नाही.

जगभरात भरपूर फूडी लोक आहेत. आजकाल लोकांना बाहेरचं खायला आवडतं. त्यामुळे स्ट्रीट फूड, ढाबा, हॉटेलमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते. मात्र आपण आवडीनं खात असलेले पदार्थ स्वच्छता असलेल्या ठिकाणी बनवलेत का? हा प्रश्न नेहमीच डोळ्यासमोर येतो. सोशल मीडियावर तर खायला बनवताना स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा असलेले अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. मॅकडोनाल्डच्या स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. व्हिडीओतील स्वयंपाक घरातील अवस्था पाहून तुम्हाला किळस, उलटी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फ्रेंच फ्राईज करण्यासाठी जी मशीन आहे तिची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. अजिबात स्वच्छता त्या ठिकाणी दिसत नसून शेवटची ती मशीन कधी स्वच्छ केली असावी याचा अंदाजही तुम्ही बांधू शकत नाही इतकी अस्वच्छ अशी ही मशीन दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by CrucialFOURFarms (@crucialfourfarms)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.