तुम्हाला कार्टून पाहायला आवडतं का? लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकाने कार्टून पाहिले असेल. काही लोकांना मोठे झाले तरी कार्टून पाहायला आवडतात. जर तुम्ही ९० च्या दशकातील असाल तर तुम्हाला शिनचॅनबद्दल नक्कीच माहिती असेल आणि तुम्ही ते पाहिलेही असेल. जपानी मंगा मालिका (Japanese manga series) खूप लोकप्रिय होती.

शिनचॅनच्या करामती पाहून कोणीही मोठ-मोठ्याने हसू शकते. शिनचॅनच्या विचित्र गोष्टींवर लहान मुल देखील लोटपोट होऊन हसतात आणि अनेकांना शिनचॅनचा आवाजही आवडतो.पण, तुम्हाला माहित आहे का? या सिरीजचे हिंदी आवृत्तीमध्ये शिनचॅनच्या पात्राला आवाज कोणी दिला आहे? माहिती नसेल तरी हरकत नाही, आम्ही तुम्हाला सांगतो. शिनचॅनच्या पात्राला आवाज देणारी व्यक्ती आहे आकांक्षा शर्मा. आकांक्षा ही एक प्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट आहे जिचे इंस्टाग्रामवर देखील चाहते आहेत.

आकांक्षा शर्मा आहे शिनचॅनच्या आवाजामागील कलाकार

आकांक्षा शिनचॅनचा आवजामध्ये बॉलीवूडच्या विविध गाणे गाताना नेहमी व्हिडिओ पोस्ट करत असते. तिने आतापर्यंत ‘ओ बेर्ददेया’पासून ते ‘मान मेरी जान’पर्यंत जवळपास सर्व गाणी गायली आहे आणि तिचा प्रत्येक व्हिडिओ लगेच व्हायरल होतो.

हेही वाचा – ”फ्रिजपेक्षा माठच चांगला!” म्हणत आनंद महिंद्रानी सांगितले फायदे, तुमच्याकडे माठ आहे का विचारताच म्हणाले…


शिनचॅनच्या आवाजात आकांक्षा अनेक गाणी गात असते
एवढंच नव्हे तर आकांक्षाने शिनचॅनच्या आवाजात ऑस्कर पुरस्कार जिंकलेले गाणे नाट्टू नाट्टू देखील गायले आहे.

आकांक्षाने श्री श्री रवीशंकर यांना भेटली होती आणि त्यांना कार्टून पात्राच्या आवाजात, तुम्हाला भेटून छान वाटले असे म्हटले होते.

हेही वाचा – तुम्ही कधी कालका-शिमला रेल्वेमार्गावर प्रवास केला आहे का? नसेल तर एकदा नक्की जा, मनमोहक दृश्याचा घ्या आनंद

स्वत:ला कॉमिडयन आणि लेखक म्हणते आकांक्षा
इंस्टाग्रामवर आकांक्षाचे ९५ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ती स्वत:ला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट शिवाय कॉमिडयन आणि लेखक देखील मानते. शिनचॅनच्या पात्रासाठी आवाज देण्याव्यतिरिक्त आकांक्षा स्टँडअप कॉमेडी देखील करते ज्याचे व्हिडिओ तिने आपल्या इंस्टा अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या व्हिडिओला सोशल मिडिया यूजर्सची खूप पसंती मिळते आणि आकांक्षाचे कौतूक करतात.

हेही वाचा- केदारनाथमध्ये वाट चुकली होती ६८ वर्षीय महिला, गुगल ट्रान्सलेटरमुळे पुन्हा भेटली कुटुंबीयांना, कसे ते जाणून घ्या

जपानी कार्टून आहे शिनचॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिनचॅनयोशितो उसुई यांनी लिहिलेले आणि चित्रित केले. या पात्राने 1990 मध्ये वीकली मांगा ऍक्शन नावाच्या जपानी साप्ताहिक मासिकात पहिल्यांदा दिसले होते.