भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात. अगदी सहपणे उदाहरण देत आपले मुद्दे मांडणे असो किंवा विरोधकांवर टीका करणं असो पंतप्रधान मोदींसारखा राजकीय वक्ता सध्या देशात सापडणार नाही असं अनेक भाजपा समर्थक म्हणतात. पंतप्रधान म्हणून मोदी अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही भाषणांच्या माध्यमातून देशाचं प्रतिनिधित्व करतात. असेच एक विशेष भाषण मोदींनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असं मोदींनी यावेळीस जगभरातील देशांना सांगितलं. मात्र त्यांचा भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतेय या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल आणि त्यानंतर व्हायरल झालेले मजेदार मिम्स.

घडलं काय?
झालं असं की, भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.

नक्की वाचा >> टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…”

मोदींचा गोंधळ आणि काँग्रेसचा टोला
या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.

सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मिम्सची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. पाहूयात यातीलच काही व्हायरल पोस्ट…

१) काय म्हणायचंय काय?


२) दोन ओळीही बोलता येत नाहीत?

३) असं झालं

४) अडकले

५) तो क्षण

६) कोणती भाषा बोलू लागले?

७) टेलीप्रॉम्टरवाल्याची वाट पाहताना

८) असाही टोला

९) संपलं… टाटा… बाय बाय…

१०) हे असं झालं म्हणे

११) बोलतायत ते पण…

१२) टेलिप्रॉम्टर बंद झाल्यावर

१३) ज्याची भिती होती तेच झालं

१४) थेट होर्डींगबाजीतून ट्रोलिंग

१५) लवकर बोला म्हणे…

१६) हे चुकीचं आहे…

१७) नायकमधील मिमच्या माध्यमातून टोला

१८) हवा भरण्याचा प्रयत्न

१९) काहींना आठवला चतुर रामलिंगम

२०) विरोधक

२१) असताना आणि नसताना…

२२) फरक

२३) ते बंद नव्हतं करायचं…

२४) तो पण देशद्रोही

२५) इथे कोणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर सोमवार रात्रीपासूनच या प्रकरणाशीसंबंधित #TeleprompterPM #Teleprompter #TeleprompterFail #TeleprompterJeevi हे हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे.