Viral Video: जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे सह-संस्थापक व मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात आणि ते त्यांचे अनुभव व नवनवीन गोष्टी नेटकऱ्यांबरोबर शेअर करीत असतात. आजही मार्क झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पण, आज त्यांनी त्यांच्या प्रकृतीसंबंधीची माहिती दिली आहे.

मार्क झुकरबर्ग यांच्या पायाची नस मिक्स्ड मार्शल आर्ट (MMA) फाईटसाठी तयारी करताना फाटली. त्यामुळे (ACL) त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ही माहिती त्यांनी नोव्हेंबरमध्ये स्वतःचा रुग्णालयातील फोटो शेअर करीत दिली होती. दुखापतीमुळे मार्क झुकरबर्ग यांच्या पायाची एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती. आता मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. काय लिहिले आहे त्यांनी पोस्टमध्ये एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: उन्हाळ्यात कलिंगडाचे थंडगार सरबत कसे बनवाल? ‘हा’ पाहा आजीबाईंचा उपाय; कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूची गरज नाही

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ शेअर करीत त्यांनी लिहिले, “शस्त्रक्रियेनंतर पाच महिन्यांनी माझी प्रकृती सुधारत आहे आणि हळूहळू माझ्यात पुन्हा ताकद येत आहे. येत्या काही महिन्यांत मिक्स्ड मार्शल आर्ट फाईटसाठी प्रशिक्षण करण्यासाठी मी खरोखर खूप उत्सुक आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि आधारासाठी धन्यवाद”, अशी कॅप्शन लिहीत त्यांनी स्वतःच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग शस्त्रक्रियेतून आता हळूहळू बरे होऊ लागले आहेत. ते जिममध्ये ‘लेग प्रेस’ व्यायाम करतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मार्क झुकरबर्ग यांच्या @zuck या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करताना आणि त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.