सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही. विशेषत: स्त्रियांना वेगळे आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करतात तर काही शस्त्रक्रिया करुन घेतात. यात अनेक मॉडेलही सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करून घेतात, त्यामुळे मॉडेलचे आयुष्य खूप महागडे असते. कारण मॉडेलला प्रत्येक वेळी सुंदर दिसावेच लागते. अशाच एका मॉडेल सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करुन घेतली, या सर्जरीसाठी तिने जवळपास ३ कोटींहून अधिक रुपये खर्च केले. एकेकाळी ही मॉडेल महागड्या गाड्यांमधून फिरत, अलिशान जीवन जगत होती. पण या सर्जरीनंतर ती अक्षरश: रस्त्यावर आली आहे, पैशांची कमरता भासत असल्याने आता चक्क तिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करावे लागत आहे.

स्वत: मॉडेलने तिची कहाणी सांगितली आहे. यात तिने तिच्या आयुष्यात एवढा मोठा टर्निंग पॉइंट कसा आला हे सांगितले आहे. नॅनेट्टे हॅमंड लोसियावो असे या अमेरिकन मॉडेलचे नाव आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ती सध्या रस्त्यावर कॅब चालवते. रोजचा खर्च भागवण्यासाठी तिने कॅब ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला, पतीपासून विभक्त झाल्यानंतर आणि घटस्फोटाची केस हरल्यानंतर तिची ही अवस्था झाली आहे. नॅनेटच्या म्हणण्यानुसार, घटस्फोटानंतर माझ्या पतीने माझ्याकडील सर्व महागड्या गाड्या घेतल्या. यानंतर तिने कॅब चालवण्याचा निर्णय घेतला.

नॅनेट्टेने एका अतिशय श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केले होते. त्यांचे हे लग्न १७ वर्षे टिकले, याकाळात नॅनेट्टेला कधी कामाची किंवा पैशांची गरज भासली नाही. पतीच्या पैशांवर ती अगदी अलिशान आयुष्य जगत होती. अनेक महागड्या गाड्यांमधून फिरत होती, त्याचे घरही अगदी राज महालासारखे आलिशान होते. इतकच नाही तर नॅनेट्टे परदेशातही ट्रॅव्हल करून आली आहे.

नॅनेट्टेने बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून तिची प्लास्टिक सर्जरी करुन घेतली. पण पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर नॅनेट्टेचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. तिच्या राहणीची पद्धत बदलली. पतीने तिच्याकडील कार, बंगला, बँक बॅलन्स काढून घेतला. नॅनेट्टेने पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली. पण ती कोर्ट केसही हरली. यामुळे नॅनेट्टेवर सध्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅब ड्रायव्हर म्हणून काम करणारी नॅनेट्टे सांगते की, जेव्हा ती कोणालातरी कॅबने घैण्यासाठी जाते तेव्हा लोक तिला पाहून आश्चर्यचकित होतात. लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात. एक मॉडेलसारखी दिसणारी सुंदर तरुणी ड्रायव्हर म्हणून काम करते यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.