scorecardresearch

माकडाने कहरच केला, वाघासोबत कुस्ती खेळायला गेला अन्…; Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले “याला मोठा होऊ द्या”

एक माकडाचं पिल्लू चक्क वाघाच्या बछड्यासोबत कुस्ती खेळताना दिसत आहे.

माकडाने कहरच केला, वाघासोबत कुस्ती खेळायला गेला अन्…; Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले “याला मोठा होऊ द्या”
माकडाने वाघाच्या बछड्यासोबतच कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला.(image-social media)

प्राण्यांच्याही हृदयात प्रेम जिव्हाळा दडलेला असतो. माणसांना पाळीव प्राण्यांसोबत खेळायला आवडतंच पण काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांसोबतही बागडतात. माकडाने मांजरीसोबत मस्ती केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच सहलीला डोंगर भागात गेल्यानंतर अनेक माकडं माणसांसोबत चाळे करताना दिसतात. पण वाघाच्या वाघासोबत माकडाला बागडताना कधी पाहिलंय का? कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक माकडाचं पिल्लू चक्क वाघाच्या बछड्यासोबत कुस्ती खेळताना दिसत आहे. खरंतर माकडाने खेळलेली कुस्ती ही मैदानी जंग नसून ती प्रेमाचं प्रतिक दर्शवणारी आहे.

माकडाच्या पिल्लाने अतिशय प्रेमळ स्वभावात वाघाच्या पिल्लाला जवळ घेतलं. त्यानंतर तो माकड बछड्यासोबत कुस्ती खेळताना दिसतो. माकडाच्या पिल्लाचं प्रेम पाहून वाघाच्या बछड्यालाही बागडण्याचा मोह आवरत नाही. या दोघांची जवळीक पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं आहे. या दोन्ही प्राण्यांनी स्वभावातील प्रेमळपण दाखवल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

नक्की वाचा – भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर आला हत्तींचा कळप, रात्रीच्या वेळी लोको पायलटने कमालच केली, पाहा Viral Video

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ टायगर्स व्हिडीओज नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २५००० हून अधिक व्यूज आले आहेत. तसंचे नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट्सचा वर्षावही केला आहे. लव्ह हर्टचे इमोजी पाठवून लोकांनी या व्हिडीओला पसंत केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलंय, हे खूप सुंदर आहे, दोघंही खूप क्यूट दिसत आहेत. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, हे खूप मोहक आहे. तर अन्य एका युजरने म्हटलं, मी तिथे असायला पाहिजे होतो आणि स्वत: लाईव्ह पाहण्याचा आनंदच वेगळा असता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 18:37 IST

संबंधित बातम्या