Viral video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.चोरी ची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता जवळपास प्रत्येक रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे आणि बाजारातील कोणतेही दुकान. त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा असलेले कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी त्यात सर्व प्रकार कैद होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चोर पैसे लुटण्याच्या उद्देशाने कॉस्मेटिकच्या दुकानात येतो खरा पण पुढे काय होतं हे तुम्हीच पाहा.

चोराचा कॉन्फिडन्स कमी पडला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर कॉस्मेटिकच्या दुकानात घुसला आहे. जिथे चोर आत गेल्यावर सर्वांना हात वर करायला सांगतो. यानंतर तो सर्वांना सर्व पैसे देण्यास सांगतो. काही वेळाने हो कॅश काउंटरवर बसलेल्या व्यक्तीकडे जातो. त्याच्याकडे पैशांची मागणीही करतो. तर दुसरीकडे खुर्चीवर बसलेली बाई उठते आणि निघू लागते. यावेळी चोर तिला थांबवतो आणि पैसे देण्यास सांगतो. पण ती महिला निघून जाते. कॅश काउंटरवर बसलेली व्यक्ती फोनवर बोलत चोराकडे दुर्लक्ष करतो. काही वेळाने चोराला कळतं की त्याचे कोणीही ऐकत नाही. आणि त्याला पाहून कोणी घाबरलेही नाही. म्हणून तो दुकानातून बाहेर पडतो. चोराचा अशा प्रकारे अपमान केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सिंह पाठी लागला म्हणून उडाला गोंधळ; पण नंतर…प्रँकचा ‘हा’ VIDEO पाहिला का? हसून हसून पोट दुखेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @crazyclipsonly नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने चोराच्या चेहऱ्याचा फोटो पोस्ट करत लिहिले, “आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल आत्मविश्वास बाळगा” तर दुसऱ्या युजरने “क्या चोर बनेगा के तू” अशी कमेंट एका युजरने केली.