Viral Video : आई-मुलांचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते मानले जाते. आई मुलांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता वाट्टेल ते करण्यासाठी तयार असते त्यामुळेच आईची तुलना ही देवासोबत केली जाते.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये दिसेल की एक म्हातारी आई मुलीला भेटण्यासाठी तीन चाकी सायकलने १७० किमीचा प्रवास करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : आईने चप्पल दाखवताच मुलगा धावत पळत सुटला, पाहा मजेशीर व्हिडीओ

या व्हिडीओत दिसते की महिला दिव्यांग आहे आणि हाताने चाक फिरवत तीन चाकी सायकल चालवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या महिलेचे नाव लिबिया आहे. त्यांची एक मानलेली मुलगी आहे जी राजगड जिल्ह्यातील एका गावात राहते. लेकीची जेव्हा तिला आठवण आली तेव्हा लिबियाबाईने तिला भेटण्याचे ठरविले पण त्यांच्याकडे बसने प्रवास करण्यासाठी पैसेच नव्हते. तरीही लिबिया यांनी हार मानली नाही. लेकीला भेटण्यासाठी त्यांनी स्वत:ची तीन चाकी सायकल वापरून मुलीच्या गावी जाण्याचे ठरविले.

हेही वाचा : OMG! “पापा की परी उड़ चली थी”, Video पाहून तुमच्याही अंगावरही येईल काटा

मीडिया रिपोर्टनुसार, ती आपल्या मुलीजवळ पोहचली आहे हा प्रवास तितका सोपा नव्हता. भर उन्हात हाताने चाक फिरवत तीन चाकी सायकलने एवढे मोठे अंतर कापणे म्हणजे खडतर प्रवासच. पण लेकीच्या मायेपोटी या माऊलीने हा प्रवास आठ दिवसांमध्ये पूर्ण केला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकजण भावूक झाले आहे.
नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काही यूजर्सनी आईच्या प्रेमाला सलाम केला आहे. एक यूजर लिहितो, “ह्रदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे, रक्ताची ओढ माणसाला किती उठा ठेवी करायला भाग पाडते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother emotional video viral a old lady travelled 170 km by tricycle to meet daughter ndj
First published on: 08-06-2023 at 14:24 IST