आपल्या सगळ्यांनाच सासू सून म्हटलं की आठवतं ते भांडण. म्हणजे हे अगदी समीकरणच झालं आहे. जर सासू चांगली असली तर तिला सून भांडखोर मिळते, तर कधी सून चांगली असली तर तिला सासू भांडखोर मिळते. अनेक सुनांचं असं म्हणणं असतं की, त्यांची सासू कटकट करते. हे करू नको, ते करू नको असा पाढा लावत असते. पण, असं असलं तरीदेखील सोशल मीडियावर सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हा व्हिडीओ आतापर्यंत लोकांच्या मनात असलेल्या आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सासू-सूनेच्या समीकरणाला खोटं ठरवत आहे. या सासू – सुनेचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सून डान्स करत आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा-नवरीचे जे खेळ खेळले जातात. त्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-नवरी नाचत आहेत, वेगवेगळ्या स्टेप करत डान्सचा आनंद घेत आहेत. ‘नवरा पाहिजे गोरा गोरा गं’ या गाण्यावर नवरी आणि नवरदेव थिरकत असतानाच सासूची एन्ट्री होते… आणि मग काय सासू सुना भन्नाट डान्स करू लागतात. हे पाहून आजूबाजूला असलेले लोकही अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: “बायकोनं हनिमूनला अश्लील कपडे घातले”, “नवरा भांडतच नाही” महिला वकिलानं सांगितली घटस्फोटाची अजब प्रकरणं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सासू आणि सून या जोडीने लोकांचे खूप मनोरंजन केलं. हा व्हिडीओ globalmarathiofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला मोठ्या संख्येने लाईक, व्ह्यूज मिळाले असून यावर नेटकऱ्यांनीही भभरून कमेंट केल्या आहेत. ‘सासू – सुनेतील हा बॉन्ड बघून खूप आनंद झाला’, अशी एका युजरने कमेंट केली आहे. ‘प्रत्येक मुलाचं स्वप्न असेल की त्याला अशी बायको मिळावी’, ‘खूपच सुंदर नृत्य… जे बघून मन खुश झाले’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.