Viral Video : सध्या मोबाईल हा रोजच्या दैनंदिन विषयाचा एक भाग झाला आहे आणि मोबाईलच्या सवयीचा परिणाम हा आपल्या रोजच्या जीवनावर नकळत होऊ लागला आहे. दिवसभर तासनतास रील बघणे, मोबाईलवर गेम खेळणे, सिनेमा पाहणे आदी अनेक गोष्टी आपल्यातील अनेकजण करताना दिसून येतात. एखादी व्यक्ती तुमच्याशी येऊन बोलत असेल तरीही आपलं लक्ष अर्ध्याहून जास्त मोबाईलमध्येचं असतं; तर सोशल मीडियावर आज असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका कुटुंबातील मुले जेवतानासुद्धा हातातला मोबाईल खाली ठेवत नाहीत हे बघून आई मुलांना चांगलाच धडा शिकवते.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ एका कुटुंबाचा आहे, ज्यात आई आणि तिची दोन मुले जेवायला बसली आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, आईची दोन्ही मुलं जेवायला तर बसली आहेत, पण त्यांचं सगळं लक्ष हे फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. आणि हे कदाचित आई आधीच बघते आणि त्यांच्या समोर जेवण वाढण्यासाठी कढई आणि टोप घेऊन येते व मुलांच्या पुढ्यात ठेवते. पण, मजेशीर गोष्ट अशी की, आई जेवण वाढायला भांडी तर आणते, पण त्या भांड्यांमध्ये जेवण नसून मोबाईल आणि इयरफोन्स असतात. आई तिच्या दोन्ही मुलांच्या ताटात चमच्याने एक एक मोबाईल आणि इयरफोन त्यांचं जेवण म्हणून वाढते; जे बघून तिची मुलेही चकित होतात. हे बघून तुम्हीही पोट धरून हसाल. जेवताना मोबाईल बघणाऱ्या मुलांची आई कशी गंमत करते एकदा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… शाहरुखचा जबरा फॅन! पठ्ठ्याने ३६ गर्लफ्रेंड, ७२ एक्स अन् ८० मित्रांसाठी बुक केलं अख्ख थिएटर, पाहा Photo

व्हिडीओ नक्की बघा :

जेवताना ताटात वाढले मोबाईल :

सगळ्यांच्या घरात प्रत्येकाची आई तिच्या मुलांना सांगून कंटाळते की, जेवताना तरी तो मोबाईल बाजूला ठेव. कितीही भूक लागली, तहान लागली तरीही आपल्यातील अनेकजण मोबाईल कधीचं बाजूला ठेवत नाहीत आणि जेवतानासुद्धा हातात मोबाईल घेऊन बसतात; तर याच गोष्टीला अनुसरून हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. मोबाईल बघून पोट भरत असेल तर जेवतानासुद्धा ताटात मोबाईलच वाढायला पाहिजे, अशी आईची भावना या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. जे बघून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @naveengaikwad13 यांच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेवणात मोबाईल’ असे मजेशीर कॅप्शन लिहिलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरतो आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण ‘आजकाल असंच दृश्य प्रत्येक घरात बघायला मिळते’, ‘अगदी बरोबर केलं काकींनी’ असे अनेकजण व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून येत आहेत.

Story img Loader