Shocking Video: सोशल मीडियावर अनेकदा रेल्वे अपघाताचे, रेल्वे प्रवासाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ट्रेनमध्ये तिकीट काढूनच प्रवास करावा असा नियम असूनही अनेक जण विनातिकीट प्रवास करत असतात, तर काहींना तिकीट काढणं परवडत नाही, ते रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. हल्ली जरी हे प्रमाण कमी असलं तरी अशा काहीशा घटना अजूनही घडताना दिसतात.

सध्या अशीच एक घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक आई रेल्वेच्या दोन डब्यांच्या मध्ये बसून प्रवास करताना दिसतेय.

हेही वाचा… “अहो बोलणारी…”, तरुणाची ‘ही’ पाटी वाचून हसाल पोट धरून, मुलींनो लग्न करत असाल तर हा PHOTO एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या चिमुकल्याला घेऊन जीवघेणा प्रवास करताना दिसतेय. ट्रेनमधील दोन डब्यांच्या मधोमध ती बसली आहे. दोन डब्यांच्या जोडणाऱ्या जॉइंटवर ती महिला आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन जीवघेणा प्रवास करताना दिसतेय. एका हातात मुलाला घेऊन आणि दुसऱ्या हाताने ट्रेनला पकडून ती जीव मुठीत घेऊन हा प्रवास करताना दिसतेय.

हा व्हायरल व्हिडीओ @sonu07332020.200k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “वाईट वेळेत साथ सोडणाऱ्याला काय माहीत की कठीण परिस्थिती कशी सहन करावी लागते”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३.९ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… जीव वाचवण्यासाठी ‘ती’ कचऱ्याच्या पिशवीत लपली; स्कूटरवरून दोघे जण आले अन्…, पाहा थक्क करणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आईपेक्षा मोठं कोणीच नसतं”, तर दुसऱ्याने “आई तर आई असते, आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.” तर एक जण कमेंट करत म्हणाली, “अशाप्रकारे मुलाला घेऊन बसणं खूप चुकीचं आहे, मुलाच्या आयुष्याशी आई खेळत आहे, कृपया एका तिकिटासाठी असं करू नका.”